आ. रमेशअप्पा कराड यांच्या वाढदिवसानिमित्त पानगाव येथील रक्तदान शिबिर,58 रक्तदात्यांनी केले रक्तदान
आ. रमेशअप्पा कराड यांच्या वाढदिवसानिमित्त पानगाव येथील रक्तदान शिबिर,58 रक्तदात्यांनी केले रक्तदान
लातूर (एल पी उगिले) : भारतीय जनता पक्षाचे नेते तथा लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आ. रमेशअप्पा कराड यांच्या जन्मदिना निमित्ताने रेणापूर तालुक्यातील मौजे पानगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबिराचे उद्घाटन भाजपाचे युवा नेते ऋषिकेश कराड यांच्या हस्ते झाले.
भाजपाचे नेते आ. रमेशअप्पा कराड यांच्या जन्मदिनानिमित्ताने भारतीय जनता पार्टी आणि आ. रमेशअप्पा कराड मित्रमंडळाच्या वतीने लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात ठीक ठिकाणी विविध विधायक उपक्रम राबवले जात आहेत. रेणापूर तालुक्यातील मौजे पानगाव येथे युवा नेते ऋषिकेशदादा कराड यांच्या शुभहस्ते रक्तदान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी निश्चित केल्याप्रमाणे 58 जणांनी रक्तदान केले. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे सांगून आ. रमेशअप्पा कराड यांच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजनेचा लाभ समाजातील गोरगरीब गरजूंना कार्यकर्त्यांनी मिळून द्यावा. असे त्यांनी बोलून दाखवले. यावेळी सतीश आंबेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून आ. रमेशअप्पा कराड यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक व्यंकटराव अनामे, मंडलाध्यक्ष महेंद्र गोडभरले, शरद दरेकर, सुकेश भंडारे, श्रीकृष्ण जाधव, गणेश तूरूप, गोपाळ शेंडगे, अमर चव्हाण, ललिता कांबळे, शीला आचार्य, भागवत गीते,शिवाजी जाधव, मारुती गालफाडे, राम भंडारे, नाथराव गीते, बाळू भंडारे, संतोष तूरूप, भूषण संपत्ते, इस्माईल मनियार, रमाकांत संपत्ते, आकाश ढोणे, दिगंबर येडले, रमाकांत वाघमारे, गोविंद नरहरी, शेख शफिक,अरुण कांबळे,ज्ञानेश्वर पांचाळ, भागवत गडगिळे, हरिभाऊ रजपूत, संजय सरनागिरे, इलाई शेख, अविनाश मोटाडे, नवनाथ पांचाळ, मनोज दुट्टे, विष्णू शिरसाट यांच्यासह इतर अनेकजण मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबुराव कस्तुरे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीरेंद्र चव्हाण यांनी केले.
