तिवटग्याळ येथे महाराणा प्रताप यांची जयंती साजरी

तिवटग्याळ येथे महाराणा प्रताप यांची जयंती साजरी
उदगीर (एल पी उगिले) : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर येथे गावातील प्रतिष्ठित नागरिक दिनेश पाटील ,उपसरपंच तथा शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष कैलास तवर, नवनाथ कच्छवे, अजय बिरादार, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे,अंगणवाडी मदतनीस भागाबाई बिरादार, शालेय विद्यार्थी आदी जणांनी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली.या वेळी शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे,प्रतिष्ठित नागरिक दिनेश पाटील, उपाध्यक्ष कैलास तवर यांनी महाराणा प्रताप यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती दिली. या वेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक दिनेश पाटील ,उपसरपंच तथा शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष कैलास तवर,नवनाथ कच्छवे, अजय बिरादार शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे,अंगणवाडी मदतनीस भागाबाई बिरादार आदी जण उपस्थित होते.