आनंदाचे चांदणे पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन

0
आनंदाचे चांदणे पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन

आनंदाचे चांदणे पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन

उदगीर (एल पी उगिले) : येथील रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान आणि दत्तगिरीजा प्रतिष्ठान टिपराळ यांच्या संयुक्त विद्यमाने कवयित्री तथा लेखिका प्रा. सुचिता गायकवाड कदम लिखित ‘ आनंदाचे चांदणे या पुस्तकाचे प्रकाशन येथील शासकीय विश्रामगृहात शनिवार दिनांक ३१ मे २०२५ रोजी सायं. ५.०० वाजता आयोजित करण्यात आले आहे. प्रकाशन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्य समीक्षक तथा महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के उपस्थित राहणार आहेत. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष प्रा. रामकिशन सोनकांबळे, राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे, साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य, विलास सिंदगीकर, हावगीस्वामी महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. सुशीलप्रकाश चिमोरे, तसेच लसाकमचे माजी तालुकाध्यक्ष रामभाऊ कांबळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या प्रकाशन समारंभास साहित्य रसिक, कार्यकर्ते, वाचकांनी उपस्थित रहावे. असे आवाहन प्रा. बिभीषण मद्देवाड, प्रा.डॉ. सोमनाथ कदम, प्रा.व्यंकट सूर्यवंशी, पी.एस. येवरीकर, विनोद कदम, डॉ. दयानंद गुडेवार आदींनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!