ल.की. उर्फ लक्ष्मीकांत पाटील च्या शैक्षणिक क्षेत्राचे नावलौकिक करतील – माजी आ भालेराव

ल.की. उर्फ लक्ष्मीकांत पाटील च्या शैक्षणिक क्षेत्राचे नावलौकिक करतील - माजी आ भालेराव
उदगीर (एल पी उगिले) : उदगीरच्या शैक्षणिक क्षेत्राची प्रगती करून ल.की. पाटील पुन्हा गतवभव प्राप्त करून देतील अशी अपेक्षा उदगीर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नेते तथा माजी आ. सुधाकर भालेराव यांनी व्यक्त केली आहे. उदगीर तालुका प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष ल.की. उर्फ लक्ष्मीकांत पाटील यांचा सत्कार केला, याप्रसंगी ते बोलत होते. या सन्मानाबद्दल लक्ष्मीकांत पाटील यांनी भालेराव यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
यावेळी पुढे बोलताना माजी आ. सुधाकर भालेराव यांनी लक्ष्मीकांत पाटील यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पी.टी.ए. च्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षकांच्या हितासाठी आणि शैक्षणिक विकासासाठी भरीव काम करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. शिक्षणाचे बाजारीकरण होत असताना शिक्षण क्षेत्रामध्ये येणारे शिक्षक आणि त्यांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. या सर्व बाबींच गांभीर्याने विचार करून संघटन कौशल्य असलेल्या लक्ष्मीकांत पाटील यांच्याकडून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील. असा विश्वासही या प्रसंगी माजी आ. सुधाकर भालेराव यांनी व्यक्त केला. शिक्षण क्षेत्रामध्ये चांगले काम करण्यासाठी पी.टी.ए. ची भूमिका महत्त्वाची असुन या संघटनेला लकी पाटील निश्चित न्याय मिळवून देतील असेही सांगितले.
नवनियुक्त तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सुधाकर भालेराव यांच्यासारख्या अनुभवी नेत्याच्या हस्ते सत्कार होणे, हे आपल्यासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात पी.टी.ए. च्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही त्यांनी दिली. या सत्कारामुळे संघटनेच्या कार्यात अधिक ऊर्जा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.