शिवाजीराव भोंदू यांचा सपत्नीक सत्कार

0
शिवाजीराव भोंदू यांचा सपत्नीक सत्कार

शिवाजीराव भोंदू यांचा सपत्नीक सत्कार

उदगीर (एल पी उगिले) : उदगीर तालुक्यातील एका टोकाला असलेल्या बोरगाव (बुद्रुक) येथील महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय येथे गणिताचे ख्यातनाम शिक्षक शिवाजीराव नंदेपा भोंदू यांनी 29 वर्ष प्रदीर्घ सेवा दिल्यानंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यामुळे बोरगाव येथील आजी-माजी विद्यार्थी व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करून त्यांना निरोप दिला. आणि त्यांच्याबद्दल आदरही व्यक्त केला.
उदगीर तालुक्यातील अत्यंत टोकाचे आणि अडगळीच्या ठिकाणी असलेले गाव बोरगाव येथे सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय सुरू करून माजी सरपंच ज्येष्ठ नागरिक जयंतराव पाटील आणि संस्थापक अध्यक्ष वामनराव बिरादार, माजी सरपंच तथा उपसरपंच एकनाथ गोजेगावे, चेअरमन देविदास करकाळे, मुख्याध्यापक एन आर शिंदे, माजी मुख्याध्यापक विश्वंभरव कांबळे, हनुमंत सुभाने, माजी उपसरपंच पंढरी लोने, तेजराव गोजेगावे इत्यादी मान्यवरांनी शिवाजीराव भोंदू यांच्या एकूण कामकाजाबद्दल गौरव उद्गार काढले.
या निरोप समारंभातच बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच शिष्यवृत्ती परीक्षेतील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार राम जाधव यांनी केले. आपल्या मनोगतातून त्यांनी शाळेच्या प्रगतीचा आलेख सांगितला. तसेच शिवाजीराव भोंदू गुरुजी यांनी मोठ्या कष्टाने शाळेचा शैक्षणिक आलेख उंचावला, याबद्दलची सविस्तर माहिती सांगितली.
संस्थाचालकांनी आणि ग्रामस्थांनी ग्रामीण भागातही विद्यार्थ्यांची सोय व्हावी, अशा उद्देशाने शाळेची स्थापना करून शैक्षणिक प्रगतीचा आलेख उभा केला आहे. आजच्या घडीला राज्यातच नव्हे तर देश पातळीवर मोठ मोठ्या शहरातून या शाळेचे विद्यार्थी यशस्वी नोकरी आणि व्यवसाय करताना आढळून येत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना या शाळेने घडवले आहे. आणि त्या विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये शिवाजीराव भोंदू गुरुजी यांचा सिंहाचा वाटा आहे, असेही सांगितले. या शाळेचे माजी विद्यार्थी जिल्हा परिषदेचे सहशिक्षक पांडुरंग सलगरे, किशनराव बिरादार, ग्रामपंचायत सदस्य मारुती जाधव, बालाजी गायकवाड यांनीही आपल्या मनोगतातून भोंदू सरांच्या एकूण कारकीर्दीबद्दल उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. याच शाळेचे सहशिक्षक रमेश सूर्यवंशी यांनी सेवापुर्ती बद्दल शुभेच्छा दिल्या. या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन शशिकांत पाटील, सहशिक्षक बालाजी सुभाने, अनिल गोजेगावे, सुनील बिरादार, दयानंद माकणे, मारुती बोरगावकर, हनुमंत वरवटे यांच्यासह अनेक आजी-माजी विद्यार्थ्यांनी केले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहशिक्षक पी.जी. कांबळे यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यंकटराव बिरादार, ज्ञानोबा सुभाने, शिवाजी भोरगीर, भीमराव पाटील, हनुमंतराव पाटील, बळीराम बोरगावकर, दत्तात्रय पाटील, गणपत काळबाचे, धनाजी जाधव, धोंडीबा कलंबरे, भरत पाटील, ज्ञानोबा जाधव, रणजीत पाटील, गोपाळ वरवडे, मारुती झिपरे, पंडित शिंदे, सुनील मोहटे इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!