एलपीजी गॅस सुरक्षितते बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात मार्गदर्शन

0
एलपीजी गॅस सुरक्षितते बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात मार्गदर्शन

एलपीजी गॅस सुरक्षितते बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात मार्गदर्शन

लातूर (प्रतिनिधी) : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या सूचनेनुसार आणि निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समिती सभागृहात एलपीजी गॅस सुरक्षितता आणि आगीपासून संरक्षण या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी संगीता टकले होत्या.
यावेळी उपजिल्हाधिकारी संदीप कुलकर्णी, प्रभारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी पंकज मंदाडे, तहसीलदार राजाभाऊ कदम, ज्ञानेश्वर काकडे, वर्षा मनाळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. साकेब उस्मानी आणि लातूर शहर महानगर पालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी गणेश चौधरी उपस्थित होते.
सूर्या गॅस सेफ्टीचे व्यवस्थापक सॅम्युअल डिसूजा यांनी घरगुती गॅस सुरक्षितता आणि उपाययोजना यावर मार्गदर्शन केले. मुख्य अग्निशमन अधिकारी गणेश चौधरी यांनी फायर एक्सटिंग्विशरच्या वापराबाबत माहिती देत, त्याचे प्रात्यक्षिक सादर केले. सहभागी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फायर एक्सटिंग्विशर वापरून प्रत्यक्ष अनुभव घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. साकेब उस्मानी यांनी केले. ‘माझं कुटुंब-माझी जबाबदारी’ या संकल्पने अंतर्गत या उपक्रमाद्वारे गॅस सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यात आली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!