जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जनजागृती

0
जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जनजागृती

जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जनजागृती

लातूर (प्रतिनिधी) : जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात तंबाखूच्या दुष्परिणामां बाबत जनजागृतीपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. लातूर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय आणि इंडियन डेंटल असोसिएशन लातूर जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी संगीता टकले होत्या.
उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) संदीप कुलकर्णी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी पंकज मंदाडे, तहसीलदार राजाभाऊ कदम, ज्ञानेश्वर काकडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. साकेब उस्मानी, इंडियन डेंटल असोसिएशनचे लातूर जिल्हाध्यक्ष डॉ. शिल्पा लठुरिया, सचिव डॉ. शैलेश पडगिलवार, डॉ. साफल्य कडतने, डॉ. नीलम जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे डॉ. अरुण बालकुंदे, डॉ. आनंद कलमे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक डॉ. नीलम जाधव यांनी केले. त्यांनी तंबाखूविरोधी जनजागृती विषयी मार्गदर्शन केले. पहिल्या सत्रात डॉ. साफल्य कडतने यांनी ‘मौखिक कर्करोग : सुरुवातीची लक्षणे’ या विषयावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात डॉ. अरुण बालकुंदे यांनी ‘तंबाखू व सुपारी यांचे दुष्परिणाम’ याविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. साकेब उस्मानी यांनी केले, डॉ. शैलेश पडगिलवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.या कार्यशाळेत जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, आरोग्य विभागाचे प्रतिनिधी आणि डेंटल असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या उपक्रमाने तंबाखू विरोधी जनजागृतीचे महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!