स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत ओबीसी, व्हिजेएनटी चा सत्ता स्थापनेत महत्वाचा वाटा – बाळासाहेब किसवे

0
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत ओबीसी, व्हिजेएनटी चा सत्ता स्थापनेत महत्वाचा वाटा - बाळासाहेब किसवे

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत ओबीसी, व्हिजेएनटी चा सत्ता स्थापनेत महत्वाचा वाटा - बाळासाहेब किसवे

लातूर (प्रतिनिधि) : राज्यातील महायुतीचे सरकार स्थापण्यात ओबीसी, व्हिजेएनटीचा वाटा मोठा आहे. त्यामुळे त्यांचे सर्वांगीण विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे.आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात ओबीसी, व्हिजेएनटी समाजाची निर्णायक अशी महत्वाची भूमिका असेल, असा दावा शिवसेना ओबीसी, व्हिजेएनटीचे प्रदेशाध्यक्ष तथा मार्गदर्शक बाळासाहेब किसवे यांनी लातूर येथे केले.
शिवसेना प्रणित भटके विमुक्त जाती जमाती सेनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे यांनी 33 जिल्ह्यात 33 दिवस संवाद दौरा केला. या संवाद दौऱ्याचा समारोप लातूर येथील दयानंद सभागृहात करण्यात आला. त्यावेळी या भव्य महामेळाव्याला संबोधित करताना बाळासाहेब किसवे हे बोलत होते. यावेळी रामभाऊ पंडागळे, मराठवाडा महिला ओबीसी अध्यक्ष पुष्पा मुंडे, जिल्हा शिवसेना सह संपर्क प्रमुख श्रीनिवास क्षीरसागर, जिल्हा प्रमुख सचिन दाने, ब्रह्मजी केंद्रे ओबीसी व्हिजेंटी जिल्हा प्रमुख विशाल भैय्या देवकते, सोलापूर जिल्हा प्रमुख सुयश करचे, सातारा जिल्हा प्रमुख हेमंत भोईटे, पुणे जिल्हाप्रमुख योगेश धरम, मराठवाडा सह संपर्क प्रमुख पंढरी जयनुरे, ओबीसी प्रवक्ते परमेश्वरराज घोडके, धाराशिव जिल्हा प्रमुख कमलाकर दाने, महिला जिल्हा प्रमुख अर्चना बिराजदार, उर्मिलाताई भगत, सातारा महिला जिल्हा प्रमुख चांदणी मुळे,सोलापूर महिला जिल्हा प्रमुख पदमजा इंगोले, परभणी महिला जिल्हा प्रमुख संगीताताई सत्वधर, युवा सेना जिल्हा प्रमुख कुलदीप सूर्यवंशी, संभाजीनगर जिल्हा प्रमुख दत्ताभाऊ म्हेत्रे, विशाल सगर, मयूर मोहिते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन दाने आदींची या संवाद दौऱ्यात प्रमुख प्रमुख उपस्थिती होती.
प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे म्हणाले की, सद्याचे उपमुख्यमंत्री तथा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या कार्यकाळात शासनाच्या विविध कल्याणकारी, लोकहिताच्या योजना ओबीसी, व्हीजेएनटी समाज घटका पर्यंत पोहचल्या. बाळासाहेब किसवे यांच्या संवाद यात्रेतून महाराष्ट्रातल्या घराघरात पक्षाचे काम पोहचवण्याचे काम केले.मागास, ओबीसी, भटक्या विमुक्ताचे प्रश्न सोडवण्याचे काम करून कार्यकर्त्यांनी संघटित होण्याचे आवाहन बाळासाहेब किसवे यांनी केले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यभरात शासनाच्या योजनाबद्दल जनजागृती केली. सर्व स्तरातील समस्याग्रस्त नागरिकांच्या गाठी भेटी घेतल्या, त्यांच्याशी संवाद सादला. त्यामुळे येत्या निवडणुकीत सत्ता स्थापनेत ओबीसी, व्हिजेएनटी मोठा वाटा असेल. असेही किसवे यांनी सांगितले.
शिवसेनेचे लोकहिताचे कार्य व विचार तळागाळात पोहचवण्याचे कार्य बाळासाहेब किसवे यांनी केले आहे. या महामेळाव्याला मोठ्या संख्येने ओबीसी व भटक्या विमुक्त सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!