भाजप च्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धा संपन्न

0
भाजप च्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धा संपन्न

भाजप च्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धा संपन्न

उदगीर (एल पी उगिले) : तालुक्यातील मौजे कल्लूर येथील पांडुरंग विद्यालय येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांच्या निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. त्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस ॲड. भारत चामे उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोल निनिडवदे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष उत्तराताई कलबुर्गे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संयोजक रामदास बेंबडे यांनी प्रास्ताविक विचार मांडले. भाजपचे ज्येष्ठ नेते विनायकरावजी बेंबडे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी विजय पाटील, दयानंद कांबळे, श्यामलताई कारमुंगे, उषाताई माने, शिवकर्णा अंधारे, भैय्या पुंड, साधू लोणीकर, सुभाष कांबळे, चंदू भातमोडे, संतोष केसगीर, संदीप कुलकर्णी, निवृत्ती बाजगीर, इत्यादी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. कलाशिक्षक चंद्रदीप नादरगे यांचे चित्र प्रदर्शन एक विशेष आकर्षण ठरले. स्पर्धेमधून उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टीचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते. भोळे आर. आर. यांनी आभार मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!