लातूर शहरात घरात लपून विक्री होत होता प्रतिबंधित गुटखा !! एक लाख आठ हजाराचा माल पकडून एलसीबीने दिला चांगला झटका !!

0
लातूर शहरात घरात लपून विक्री होत होता प्रतिबंधित गुटखा !! एक लाख आठ हजाराचा माल पकडून एलसीबीने दिला चांगला झटका !!

लातूर शहरात घरात लपून विक्री होत होता प्रतिबंधित गुटखा !! एक लाख आठ हजाराचा माल पकडून एलसीबीने दिला चांगला झटका !!

लातूर (एल पी उगिले) : लातूर जिल्ह्यात चालू असलेल्या अवैध गुटखा विक्रीच्या विरोधात चांगलीच ओरल सुरू झाली होती. महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखू आपल्या व्यक्तिगत फायद्यासाठी विक्री करणाऱ्याच्या विरुद्ध कारवाई करण्याच्या आदेश जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिले होते. वरिष्ठांच्या आदेशाची पालन करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कठोर कारवाई केली आहे. घरात साठवून ठेवलेला एक लाख आठ हजार रुपयांचा गुटखा पकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे,यांचे मार्गदर्शनात 1 मे 2025 पासून अवैध धंद्यावर कठोर कारवाई साठी “अवैध व्यवसाय निर्मूलन अभियान-1” संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना दिनांक 30/05/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी एक इसम प्रतिबंधित गुटखा, राहते घरामध्ये साठवून ठेवल्याची माहिती मिळाली. सदर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे मार्गदर्शनात सदरचे पथक दिनांक 30/05/2025 रोजी दुपारी लातूर शहरातील इस्लामपुरा भागातील एका घरावर छापा मारून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला 1 लाख 8 हजार 216 रुपयांचा गुटखा व सुगंधित तंबाखूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्रतिबंधित गुटका, सुगंधित तंबाखूची अवैधरित्या साठवणूक व विक्री करीत असताना मिळून आलेला इसम नामे रामेश्वर नामदेव नाईकवाडे , (वय 37 वर्ष, राहणार शिवपार्वती मंगल कार्यालयाजवळ, बसवेश्वर चौक, लातूर) याचे विरुद्ध पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास लातूर पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार रियाज सौदागर, अर्जुन राजपूत, मनोज खोसे, राहुल कांबळे, नितीन कठारे यांनी केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!