शास्त्री प्राथमिक विद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती

0
शास्त्री प्राथमिक विद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती

शास्त्री प्राथमिक विद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती

उदगीर (प्रतिनिधी) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा साठी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे,प्रमुख वक्ते म्हणून माधव केंद्रे तसेच मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे व विभाग प्रमुख सुधाकर पोलावार उपस्थित होते.मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माधव केंद्रे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे बालपण,धार्मिकता व राज्यकारभार याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपपर भाषणात मुख्याध्यापक शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजासाठी, देशासाठी कार्य करावे.आपल्या विद्यार्थ्यांना साहित्य वाचनास प्रेरीत करण्याचे आवाहन केले.सुत्रसंचलन सौ.भाग्यश्री स्वामी यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!