स्व.गंगाधर सुपारे यांच्या स्मरणार्थ खाऊ वाटप
स्व.गंगाधर सुपारे यांच्या स्मरणार्थ खाऊ वाटप
उदगीर (प्रतिनिधी) येथील जीवन प्रयाग फाऊंडेशन यांच्यावतीने स्व. प्रा गंगाधर सुपारे यांच्या स्मरणार्थ रोकडे हनुमान मंदिर येथे खिचडी, जिलेबी इत्यादी खाऊ वाटप करण्यात आले.
आपली सामाजिक जबाबदारी लक्षात घेता समाजातील प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिपरत्वे आपण काहीतरी देणे लागतो, हेच देणे आणि त्याची कृतज्ञता लक्षात घेऊन स्व.गंगाधर सुपारे यांच्या पुण्यतिथी निमित्त भाविक भक्तांना खिचडी, जिलेबी वाटप करण्यात आले.
जीवन प्रयाग फाऊंडेशन ही सामाजिक संस्था नेहमीच समाजाचे गांभीर्य ठेवून वावरत असते, आणि समाजाप्रती असलेला आदरभाव जपत असते. विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून ही संस्था आणि संस्थेचे सभासद समाजकार्य करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. यावेळी जीवन प्रयाग फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रभात सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते दयानंद कांबळे, शिक्षक नारायण शिरसागर, नितीश शिरशे, विजयकुमार कांबळे, शुभम सुपारे, क्षितिज जाधव व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
