जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त गुटखा सुराचे दहन

0
जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त गुटखा सुराचे दहन

जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त गुटखा सुराचे दहन

उदगीर (प्रतिनिधी) : कै. बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालय व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा उदगीर तर्फे शाखेचे कार्याध्यक्ष प्राचार्य विजयकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी विचार मंचावर लातूर शाखेचे उपाध्यक्ष विश्वनाथ मूडपे, उदगीर शाखेचे प्रधान सचिव शिरीष रोडगे, बाबुराव वाघमारे
व प्राचार्य ओमप्रकाश क्षीरसागर उपस्थित होते.
प्रथम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यान्च्या कार्याचा गौरव करून त्यांना अभिवादन करण्यात आले. नंतर
प्रा. डॉ. हिराबाई मोरतुळे, प्रा. यशवंत मोर्तुळे, प्रा. डॉ. श्रीहरी गायकवाड व वसंत पवार यांचा विडी सिगारेट इत्यादी तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करीत नसल्याबद्दल निर्व्यसनी व्यक्ती म्हणून प्राचार्य विजयकुमार पाटील यांच्या हस्ते ग्रंथ भेट देऊन गौरव करण्यात आला. जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ मुडपे यांनी मार्गदर्शन करताना तंबाखू जन्य पदार्थ सेवन केल्यामुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामाची व रोगांची माहिती सांगून तंबाखूजन्य पदार्थ सेवन न करण्याचे आवाहन केले. शिरीष कुमार रोडगे व बाबुराव वाघमारे यानीही मार्गदर्शन केले.
प्राचार्य ओमप्रकाश क्षीरसागर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. अनंत शिंदेने सूत्रसंचालन केले. प्रा.जोगन मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
महाविद्यालयाच्या प्रांगणात तंबाखूचा निषेध करण्यासाठी गुटखासुराच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. सिगरेटची कान्डी उडवी आयुष्याची दान्डी, सेवन करता तंबाखू गुटखा हृदयविकाराचा झटका, विडी तंबाखूची आस, बसेल कॅन्सरचा फास इत्यादी घोषणा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!