शेकापूर येथे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

0
शेकापूर येथे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

शेकापूर येथे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

उदगीर (प्रतिनिधी) : तालुक्यातील मौजे शेकापूर येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून उपसरपंच संदीप हलकरे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच ज्ञानोबा कोनाळे, सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष लक्ष्मण फुलारी भालके, ग्रामसेवक अरविंद शिंदे, विठ्ठल शेळगे, ग्रामपंचायत सदस्य मनोहर शिंदे, विजयमाला पवार, नामदेव सावंत, रामेश्वर बुके, शुभम वाघमारे, अनिल शेलाळे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी ग्रामसेवक अरविंद शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. अध्यात्मिक बाबी मध्ये त्यांनी केलेल्या मंदिराच्या जीर्णोद्धाराची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन विजयमाला पवार यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!