महापुरुषांच्या विचाराने नव्या पिढीला प्रेरणा मिळते : आ.संजय बनसोडे

0
महापुरुषांच्या विचाराने नव्या पिढीला प्रेरणा मिळते : आ.संजय बनसोडे

महापुरुषांच्या विचाराने नव्या पिढीला प्रेरणा मिळते : आ.संजय बनसोडे

उदगीर (एल पी उगिले) : आपल्या सर्वांवर बालपणापासूनच महापुरुषांचा विचार आपल्या पूर्वजांनी आपल्यात रुजविले आहेत. आपल्या सर्व महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण आपले जीवन जगत असतो. आपल्या पूर्वजानंतर आता आपण आपल्या पुढच्या पिढीला सर्व महापुरुषांचे विचार सांगुन त्यांना सक्षम बनवण्यासाठी प्रयत्नशील असतो कारण महापुरुषांच्या विचारानेच नव्या पिढीला प्रेरणा मिळत असल्याचे मत माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते उदगीर तालुक्यातील देवर्जन येथील पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन करुन विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष वसंत पाटील, देवर्जनचे सरपंच अभिजित साकोळकर, शंकर रोडगे, दयानंद रोडगे, वैजनाथ वाडीकर, राजकुमार बिरादार, संतोष पवार, अशोक बिरादार, अशोक जाधव, अंतेश्वर रोडगे, गंगाधर दवणीपुरगे, युवराज धोतरे, व्ही. एस. कुलकर्णी, विनोद रोडगे, तुकाराम खटके, संदेश खटके, नारायण पाटील, ईश्वर रोडगे, धनराज हेबतपुरे, प्रा. बस्वराज धोतरे, जयराज धोतरे, अनिल रोडगे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार संजय बनसोडे यांनी, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे म्हणून आजचा दिवस हा पवित्र आहे. राजमाता अहिल्याबाई होळकरांनी भारतभर अनेक मंदिरे आणि धर्मशाळा बांधल्या. त्यांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. विविध सामाजिक सुधारणा करुन लोकांच्या हितासाठी काम केले अशा राजमातेस मी नतमस्तक होतो.
यावेळी देवर्जन येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक व महात्मा बस्वेश्वर महाराज चौकाचे लोकार्पण व लिंगप्पा मठ सभागृह, महर्षी वाल्मीक मंदिर सभागृह व बौद्ध विहाराचे भमिपुजन आ.संजय बनसोडे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी महर्षी वाल्मिक मंदिराच्या सभागृहाला आमदार फंडातुन १५ लक्ष रुपयाचा निधी तर बौद्ध विहाराला १५ लक्ष रुपयाचा निधी आ.संजय बनसोडे यांनी दिला आहे. त्याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सुशोभिकरणासाठी निधी उपलब्ध करुन देणार असल्याची ग्वाही माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी दिली.यावेळी देवर्जनसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!