न.प. च्या वतीने तरुणींना स्वरक्षणाचे धडे

0
न.प. च्या वतीने तरुणींना स्वरक्षणाचे धडे

न.प. च्या वतीने तरुणींना स्वरक्षणाचे धडे

उदगीर (एल पी उगिले) : समाजातील अनेक तरुणी अन्याय , अत्याचाराला बळी पडत आहेत. त्यांच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण करुन, स्वसंरक्षण कसे करावे? तसेच त्यांच्यात आत्मनिर्भयता निर्माण व्हावी, या उद्देशाने उदगीर नगरपरिषद कार्यालयाला अंतर्गत शहरातील तरुणींना आत्मरक्षणाचे धडे देण्यासाठी कराटे प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबिराचे मार्गदर्शन तज्ञ कराटे प्रशिक्षकासोबतच नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी केले आहे.
शहरातला 65 तरुणींना कराटे मास्टर बापू सोळुंके यांनी वुशु असोसिएशन उदगीर यांच्या द्वारे कराटे प्रशिक्षण दिले.
या सर्व तरुणींना संपूर्ण एक महिन्याचे प्रशिक्षण संपन्न झाले. सदरील कराटे प्रशिक्षण शिबीर हावगिस्वामी महाविद्यालय मैदान, रेल्वे स्टेशन रोड, उदगीर या ठिकाणी आयोजित केले होते. शिबीरा मध्ये सर्व सहभागी प्रशिक्षणार्थी यांना सहभाग प्रमाणपत्र तसेच टि-शर्ट दि. 05/06/2025 रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून देण्यात येणार आहेत. तसेच “एक पेड, माँ के नाम” या वृक्षारोपण रोपण मोहीम अंतर्गत सहभागी यांच्या हस्ते, मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण उदगीर शहरात केले जाणार आहे. आयोजित शिबीर यशस्वी रित्या पार पाडण्या साठी कोमल केंद्रे शहर अभियंता,राधा जमाले विदयुत अभियंता, महारुद्र गालट शहर अभियान व्यवस्थापक, प्रफुल अदावळे शहर समन्वयक, यांनी मेहनत घेतली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!