संभाजी ब्रिगेड कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती
संभाजी ब्रिगेड कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती
उदगीर (प्रतिनिधी) : येथील संभाजी ब्रिगेडच्या जनसंपर्क जिल्हा कार्यालयात अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजकुमार माने यांनी आपले मत व्यक्त केले की, अहिल्यादेवी होळकर एकुलता मुलगा निधन पावल्यावर राज्यकारभार हाती घेतला व अनेक विरोधकाचा त्यांनी पराभव केला. तीर्थक्षेत्रावर मंदिरे बांधली, घाट, विहिरी, पायऱ्या, रस्ते , अन्न क्षेत्र उभारली, पानवटे उभारले तीनशे वर्षाचा इतिहास आजही प्रेरणा दायी आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे विधानसभा अध्यक्ष उत्तमराव फड, जिल्हा सचिव मोहनेश्वर विश्वकर्मा, जिल्हा संघटक राम रावणगावे , मनोहर हिंडे, मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक सुकणे , मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष प्रदीप ढगे, जयवंत बिरादार, मुरलीधर बिरादार इत्यादी उपस्थित होते.
