शासकीय अध्यापक विद्यालयात 99 च्या विद्यार्थ्याच्या बॅचचे स्नेह मिलन

0
शासकीय अध्यापक विद्यालयात 99 च्या विद्यार्थ्याच्या बॅचचे स्नेह मिलन

शासकीय अध्यापक विद्यालयात 99 च्या विद्यार्थ्याच्या बॅचचे स्नेह मिलन

उदगीर (एल पी उगिले) : शासकीय अध्यापक विद्यालय उदगीर येथील शैक्षणिक वर्ष 1999-2001 या वर्षाचा स्नेह मेळावा (गेट टुगेदर) अतिशय उत्साहात संपन्न झाला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शासकीय अध्यापक विद्यालय उदगीर येथील सेवानिवृत्त गणित विषयाचे सहशिक्षक के आर शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठी विषयाचे सेवानिवृत्त सहशिक्षक आर टी घंटेवाड, कार्यानुभव विषयाचे सेवानिवृत्त सहशिक्षक पी डी पाटील, श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालय उदगीर येथील एनसीसी अधिकारी बालाजी मुस्कावाड, संगीत शिक्षण घोगरे हे उपस्थित होते.
सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करुन करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आर टी घंटेवाड आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, स्नेह मेळावा दरवर्षी आयोजित करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपली मैत्री टिकून राहते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पी डी पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, सर्वप्रथम हा स्नेह मेळावा आयोजित करण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला त्या प्रसिद्ध साहित्यिका वर्षाराणी मुस्कावाड व तेजेवाड यांचे अभिनंदन करतो. तुम्ही सर्वजण आपापल्या क्षेत्रात उत्तम कार्य करत आहात, हे ऐकुन खूप आनंद झाला. तुम्हा सर्वांना जीवनात असेच चांगले कार्य करावे, यासाठी शुभेच्छा देतो.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बालाजी मुस्कावाड आपल्या सांगितले की , आपण सर्वजण शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानदानाचे कार्य करत आहात, आणि हे सर्वात पवित्र कार्य आहे. या पृथ्वीतलावर अविनाशी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे ज्ञान होय. बाकी सर्व नाशवंत आहे. तेव्हा विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत.
अध्यक्षिय समारोपात के आर शिंदे म्हणाले, हा स्नेह मेळावा म्हणजे गेट-टुगेदर केवळ एकत्र जमण्याचा प्रसंग नसून आपल्या स्नेहबंधांना अधिक घट्ट करणारा आणि अनेक सकारात्मक आठवणींच्या गाठी बांधणारा एक सुंदर सोहळा आहे. प्रत्येक व्यक्ती मध्ये एक राजहंस दडलेला असतो. शिक्षक तो शोधून त्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. शिक्षकांची भूमिका आजही खूप महत्त्वाची आहे. शिक्षक हा व्यसनमुक्त असला पाहिजे कारण समाज घडविण्याचे महान कार्य तो करत असतो.
प्रमुख पाहुणे संगीत शिक्षण घोगरे यांनी महाराष्ट्र गीत गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
शैक्षणिक वर्ष 1999-2001 या बॅचमधील उपस्थित सर्वच मित्र मैत्रिणी यांनी आपल्या मनोगतातून आपल्या कार्याचा परिचय करुन दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्वागत गीत शांतिनिकेतन विद्यालय कोदळी येथील सहशिक्षिका वर्षाराणी मुस्कावाड यांनी केले तर आभार सहशिक्षक हरिओम अंतुरे यांनी मानले. यावेळी या बॅचचे अनेक मित्र- मैत्रिणी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वर्षाराणी मुस्कावाड, गोविंद फड, तेजेवाड सर, अमोल जोशी, दिलीप नागरगोजे ,सुरेखा दंडिमे, पद्मसाळी डी. एम., हरिओम अंतुरे, प्रतिभा गडेकर, अच्युत धुळगुंडे, सूर्यकांत राजले , सुरेश कांबळे यांनी सहकार्य केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!