4 जून रोजी रक्तदान शिबिराच्या आयोजन

0
4 जून रोजी रक्तदान शिबिराच्या आयोजन

4 जून रोजी रक्तदान शिबिराच्या आयोजन

उदगीर (प्रतिनिधी) : सध्या रक्तपेढीमध्ये रक्त साठा कमी असल्यामुळे मागणी वाढली आहे. अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. या गोष्टीचे गांभीर्य विचारात घेऊन जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक जाणीव जोपासाव्यात, अशा पद्धतीचे आवाहन उदगीर तालुका माहेश्वरी सभेचे अध्यक्ष श्रीनिवास सोनी यांनी केले आहे.
येथील माहेश्वरी सभेच्या वतीने महेश नवमीचे औचित्य साधून 4 जून 2025 रोजी लक्ष्मीनारायण मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी आपले आरोग्य सुदृढ व्हावे, या दृष्टीने रक्तदान करावे. रक्तदान केल्याने शुद्ध रक्त पुन्हा लगेच 48 तासात पूर्ववत तयार होते. विज्ञान कितीही प्रगत झाले असले तरी कृत्रिम रित्या रक्त निर्माण करता आले नाही. त्यामुळे एखाद्या गंभीर स्वरूपाच्या रुग्णाला किंवा आजारी असलेल्या व्यक्तीला किंवा अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीला वेळीच उपचार करायचे असतील तर रक्त आवश्यक असते. त्यासाठी रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून सहकार्य करावे. असेही आवाहनही श्रीनिवास सोनी यांनी केले आहे.
दिनांक 4 जून रोजी दुपारी एक ते चार या वेळेच्या दरम्यान रक्तदान करून सहकार्य करावे, रक्तदात्यांनी पूर्व नोंदणी केल्यास व्यवस्थेसाठी सोयीचे होईल असेही संयोजकांच्या वतीने कळवले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!