तालुका माहेश्वरी सभेच्या वतीने डोळे, रक्त तपासणी शिबिराची सुरुवात

0
तालुका माहेश्वरी सभेच्या वतीने डोळे, रक्त तपासणी शिबिराची सुरुवात

तालुका माहेश्वरी सभेच्या वतीने डोळे, रक्त तपासणी शिबिराची सुरुवात

उदगीर (एल पी उगिले) : उदगीर तालुका माहेश्वरी सभा,मारवाडी युवा मंच व उदयगिरी लायन्स धर्मादाय नेत्र रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने महेश नवमी निमित्त 2, 3जून रोजी मारवाडी समाजातील संपूर्ण परिवाराचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी रक्त तपासणी व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. त्या शिबिराचे उद्घाटन लायन्स नेत्र रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रामप्रसाद लखोटिया, ईश्वरप्रसाद बाहेती , लक्ष्मीनारायण लोया,सुभाष पालीवाल, जगदीश बागडी,विनोद टवानी , डॉ प्रवीण मुंदडा, कैलास बियाणी, अशोक बाहेती,पन्नालाल बजाज,ओमप्रकाश गिल्डा,द्वारकादास भुतडा ,प्रकाश कालानी, डॉ भिकमचंद सोनी, यांच्या उपस्थितीत पार पडले.
हे शिबिर यशस्वितेसाठी माहेश्वरी सभे चे अध्यक्ष श्रीनिवास सोनी,सचिव राजगोपाल मणियार,आनंद बजाज, राधेश्याम इनानी, संजय नावंदर, विष्णुदास लोया, गणेश बजाज,राजेश सारडा,अमोल राठी, सत्यनारायण सोमाणी,शिरीष नावंदर,रामविलास नावंदर,युवा मंचचे अध्यक्ष गोविंद मुंदडा,सचिव उमेश कालानी,सुरेश तिवारी, अनुप बजाज, लक्ष्मीकांत सोमाणी,अमर सारडा,पवन मुंदडा, रोहित सोमाणी,सूरज नावंदर,साईराम बाहेती, वेदांत सोनी, कमल बाहेती, राजस्थानी महिला मंडळ अध्यक्ष डॉ सौ.संगीता सोनी,माधुरी मोदानी,सोनी हेमलता सह सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. दोन जून रोजी झालेल्या शिबिरात 130 जणांचे रक्त,डोळे तपासण्यात आले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!