शांतिनिकेतन विद्यालय कोदळी येथील विद्यार्थ्यांचे इंडियन टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये घवघवीत यश
शांतिनिकेतन विद्यालय कोदळी येथील विद्यार्थ्यांचे इंडियन टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये घवघवीत यश
उदगीर (एल पी उगिले) : तालुक्यातील मौजे कोदळी येथील शांतिनिकेतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. इयत्ता सहावी ते दहावी पर्यंतच्या एकुण 40 विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये सहभाग नोंदवलेला होता . या सर्वच विद्यार्थ्यांनी अतिशय मेहनत घेऊन जनरल नॉलेजचा अभ्यास करुन ही परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे .
सर्वप्रथम इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी अंकिता तानाजी गादगे या विदयार्थिनीने 82 %गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. त्यानंतर दहावीतील संध्या दत्ता जाधव या विद्यार्थिनीने 80% टक्के घेऊन द्वितीय क्रमांक संपादन केलेला आहे. शिवानी संभाजी ढोकळे या विद्यार्थिनीस 79 टक्के घेऊन तृत्तीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहे.
इयत्ता सहावीच्या जय नरसिंग बिरादार यांनी 66% गुण घेवून प्रथम आलेला आहे.विजय बिरादार याची 62% गुण घेवून द्वितिय क्रमांक पटकावलेला आहे.इयत्ता सातवी वर्गातून आदिती प्रकाश सुतार, प्रिती मनोहर कांबळे या दोघींनी 65% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. दुर्गा तुकाराम फिरंगवाड हिला 64% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला.
इयत्ता आठवी वर्गातून अस्मिता श्रावण किंवडे, आणि रमा नागनाथ सुतार 69% या दोघींनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. मिरा तुकाराम बोने 68% घेवून द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे.इयत्ता नववी मध्ये प्रथम सोनाली नामदेव कल्याणी 71%, गुण प्राप्त झालेले आहेत. सृष्टी दत्ता जाधव 70% घेवून द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. शितल बबन जपावाड 69% गुण घेवून तृतीय क्रमांक मिळवलेला आहे.
या विद्यार्थ्यांकडून सहशिक्षिका वर्षाराणी मुस्कावाड यांनी नियमित दुपार सत्रात जनरल नॉलेजचा अभ्यास आणि पाठांतर करून घेण्यात आलेलं होतं. त्यामुळेच हे यश संपादन झालेले आहे . या विद्यार्थांना वारंवार मार्गदर्शन केलेले आहे. त्यामुळेच विद्यार्थी हे यश संपादन करू शकले. जागतिकिकरणाच्या युगामध्ये स्पर्धा परिक्षेला अतिशय महत्वाचे स्थान आहे. आपलेही विद्यार्थी या परिक्षेत नावलौकीक करावं, आणि शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांनी या परिक्षेचा अभ्यास करावा म्हणजे पुढील आव्हानांना ते सामोरे जातील.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व यांना मार्गदर्शन करणाऱ्या सहशिक्षिका वर्षाराणी मुस्कावाड यांचे अभिनंदन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. आशुतोष पाटील, मुख्याध्यापक राजेंद्र भोसले, सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.
