आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे व्यापक बैठक
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे व्यापक बैठक
लातूर (एल पी उगिले) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लातूर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सभासद नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पक्ष संघटन वाढीसाठी सर्वांनी युद्ध पातळीवर प्रयत्न करावेत अशी चर्चा करतानाच सद्यस्थितीचाही आढावा घेतला.लातूर जिल्ह्यात पक्ष चांगल्या प्रकारे वाढत आहे. आपण मोठ्या प्रमाणावर क्रियाशील सभासद नोंदणी केली तर आपल्याला जिल्ह्यातील सर्वच कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये संधी देण्याचा प्रयत्न करू शकतो, असे मत ना. बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
कार्यकर्त्यांनी आपला स्वाभिमान आणि सन्मान टिकवायचा असेल तर पक्षाला ताकद देणे ही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नैतिक जबाबदारी आहे. प्रत्येकाने क्रियाशील सभासद होणे आवश्यक आहे. पक्षाचा विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवून घरोघरी जाऊन नोंदणी केली तर एक प्रकारे पक्षाचा प्रचार होईल, असे मार्गदर्शन केले.
या प्रसंगी माजी मंत्री तथा आ. संजयजी बनसोडे, शिक्षक आ. विक्रम काळे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अफसर बाबा शेख, प्रदेश सरचिटणीस व्यंकटराव बेद्रे, प्रदेश सरचिटणीस बबनराव भोसले, प्रदेश सरचिटणीस मूर्तजा खान, शहर कार्याध्यक्ष प्रशांत पाटील, प्रदेश सरचिटणीस शिवानंद हेंगणे, प्रदेश सरचिटणीस इब्राहिम सय्यद, प्रदेशचे संघटक सचिव तथा उदगीर खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत भाऊ चामले, उदगीर तालुका कार्याध्यक्ष वसंत पाटील, उदगीर शहराध्यक्ष सय्यद जानीमिया, महिला शहराध्यक्ष प्रणिताताई सूर्यवंशी, लाला सूर्यवंशी, युवा नेते गजानन भोपणीकर, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शफी हाश्मी, शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष मदन धुमाळ,अनिल मल्ले, अहमदपूर तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष विठ्ठल पाटील शेंडकर, निलंगा तालुका अध्यक्ष हरिदास साळुंखे, उदगीर तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, देवणी तालुका अध्यक्ष महेश देवणे, युवक जिल्हाध्यक्ष महेश बिरादार, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळू केंद्रे, नवनाथ आल्टे, तसेच सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख कार्यकर्त्याची संघटन बांधणीची ही बैठक मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली असून, प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी आपापल्या तालुक्यामध्ये पक्ष संघटन वाढीसाठी प्रयत्न करतील. असा विश्वासही याप्रसंगी माजी मंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केला.
