अवैध वाळू उपसाबाबत तहसील कार्यालय नांदेडची कारवाई
अवैध वाळू उपसाबाबत तहसील कार्यालय नांदेडची कारवाई
नांदेड (प्रतिनिधी) : नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय नांदेडचे महसूल पथक यामध्ये नायब तहसीलदार स्वप्निल वामनराव दिगलवार, ग्राम महसूल अधिकारी रमेश गिरी ,मनोज सरपे ,दिलीप पवार ,माधव पाटील , गोपीनाथ कल्याणकर, मंडळ अधिकारी राजेंद्र शिंदे तसेच महसूल सेवक बालाजी सोनटक्के यांच्यासोबत मार्कंड येथील गोदावरी नदीपत्रात गस्त करत असताना दोन वाळू उपसा करणारे इंजिन व आठ तराफे आढळून आले. पथकाने आठ तराफे जाळून नष्ट केले व दोन इंजिन जप्त करून तहसील कार्यालयाच्या परिसरात जमा करण्यात आले आहेत.

या कारवाई मध्ये ११ लक्ष रुपयाची इंजिन व तराफे जप्त करण्यात आले आहेत .सदर कारवाईच्या वेळी नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी गवळी हे उपस्थित होते. वाळू उपसा करणाऱ्या इंजिन मालकांबाबत माहिती मिळू शकली नाही. मालकाचा शोध लागताच याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे. अशी माहिती तहसीलदार संजय वारकड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
