शेतकऱ्यांना खते व बि-बियाणांचा पुरवठा वेळेवर उपलब्ध करुन द्या : आ.संजय बनसोडे

0
शेतकऱ्यांना खते व बि-बियाणांचा पुरवठा वेळेवर उपलब्ध करुन द्या : आ.संजय बनसोडे

शेतकऱ्यांना खते व बि-बियाणांचा पुरवठा वेळेवर उपलब्ध करुन द्या : आ.संजय बनसोडे

उदगीर (एल पी उगिले) : जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांची कृषी विभागाने काळजी घेवुन जबाबदारीने त्यांना खते व बी – बियाणांचा पुरवठा वेळेत करावा. खतांचा साठा, बियाणांचे प्रमाण याची खात्री करुन घ्यावी. पेरणीच्या वेळी खतांचा तुटवडा भासणार नाही याची काळजी घेवुन संबंधित कृषी सेवा केंद्राच्या बाहेर खते व बियाणांची माहिती फलक लावुन शेतकऱ्यांना खते व बि-बियाणांचा पुरवठा वेळेत उपलब्ध करुन द्या, अशा सुचना माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी अधिका-यांना दिल्या.

ते उदगीर येथील तहसील कार्यालयातील तालुका स्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत बोलत होते.यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवसांब लाडके, जिल्हा कृषी अधिकारी सुटे, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे,जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदिप काळे, उपविभागीय कृषी अधिकारी श्रेयश यादव, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, जळकोटचे गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार, उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी, शहरचे पोलीस निरीक्षक दिलीप गाडे, जळकोटचे तहसिलदार राजेश लांडगे, श्याम डावळे, बालाजी भोसले, वसंत पाटील, सय्यद जानीमियाँ, यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी, परवाच्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाचे प्रशानाच्या वतीने पंचनामे करण्यात आले असुन शासन दरबारी त्याचा पाठपुरावा करुन शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मतदार संघातील रस्ते, वीज, पाणी आदी योजनांचा आढावा यावेळी आ.संजय बनसोडे यांनी घेतला.भविष्यातील पाणी टंचाईचा विचार करुन वाटरग्रीड ही महत्वकांशी योजना केवळ उदगीर मतदार संघात असुन यामध्ये समाविष्ट असलेल्या गावांना याचा फायदा होणार आहे. मतदार संघातील समस्या सोडवण्याकरीता आता महिन्याला जनता दरबार घेवुन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवणार आहे. महाविस्तार ॲपचे शेतकरी बांधवांना कृषी विभागाच्या वतीने मार्गदर्शन करुन त्यांना माहिती द्यावी.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!