शास्त्री विद्यालयात सेवानिवृत्त शिक्षक बालाजी जाधव यांचा सेवापुर्ती गौरव समारंभ संपन्न
शास्त्री विद्यालयात सेवानिवृत्त शिक्षक बालाजी जाधव यांचा सेवापुर्ती गौरव समारंभ संपन्न
उदगीर (एल पी उगिले) : लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयातून नुकतेच सेवानिवृत्त झालेले शिक्षक बालाजी जाधव यांचा सेवापुर्ती गौरव समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकरराव वट्टमवार होते . तर व्यासपीठावर स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह शंकरराव लासुणे, शालेय समितीचे अध्यक्ष सतनप्पा हुरदळे,मुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे, उपमुख्याध्यापक अरुण पत्की, पर्यवेक्षक कृष्णा मारावार,माधव मठवाले, सत्कारमूर्ती बालाजी जाधव त्यांच्या पत्नी सौ.राजाबाई जाधव उपस्थित होत्या. बालाजी जाधव यांचा विद्यालयातर्फे सपत्नीक सत्कार करण्यात आला.
बालाजी जाधव यांनी आपल्या
मनोगतातून भारतीय शिक्षण प्रसारक संस्था व लालबहादूर शास्त्री विद्यालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून संस्थेमुळेच मी शिक्षकी पेशाचा आनंद घेऊ शकलो असे सांगितले.
तर अध्यक्षीय समारोपात मधुकरराव वट्टमवार यांनी बालाजी जाधव यांच्या स्वभाव गुणवैशिष्ट्याचे कौतुक करून त्यांच्या अध्यापनातील निष्ठेबद्दल गौरवोद्गार काढले. याप्रसंगी विद्यालयातील उपमुख्याध्यापक अरूण पत्की यांची मुख्याध्यापक पदावर पदोन्नती झाल्याबद्दल सत्कार तर मुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे यांची लातूर येथील केशवराज विद्यालयात बदली झाल्याबद्दल निरोप देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बालाजी पडलवार यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
