सैनिकी विद्यालयाच्या संकेत केशोडचे जेईई अँडव्हान्स परीक्षेत यश

0
सैनिकी विद्यालयाच्या संकेत केशोडचे जेईई अँडव्हान्स परीक्षेत यश

सैनिकी विद्यालयाच्या संकेत केशोडचे जेईई अँडव्हान्स परीक्षेत यश

उदगीर (एल पी उगिले) : श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील संकेत केशोड या विद्यार्थ्याने जेईई अँडव्हान्स परीक्षेत अनुसूचित जमाती या प्रवर्गातून 1468 वी रॅंक प्राप्त केली आहे.
जेईई अँडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत सैनिकी विद्यालयातील संकेत केशोड या विद्यार्थ्याने उत्तम यश संपादन केले आहे.सैनिकी विद्यालयात बारावी बोर्डाच्या अभ्यासक्रमा बरोबरच जेईई, निट, स्पर्धा परीक्षा, एनडीए, सीईटी या परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांकडून एकाच छताखाली करुन घेतली जाते. विद्यार्थी वसतिगृहात राहत असल्यामुळे तो व्यसन व मोबाईल यापासून दूर राहतो.
संकेत केशोड या विद्यार्थ्याने जेईई अँडव्हान्स परीक्षेत उत्तम यश संपादन केल्याबद्दल त्याचे व त्याला मार्गदर्शन करणारे प्रा प्रदीप कोठारे, प्रा सीमा मेहत्रे, प्रा शिवाण्णा गंदगे, प्रा नितीन पाटील प्रा युवराज दहिफळे यांचे अभिनंदन प्राचार्य वसंत कुलकर्णी, पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के, विभाग प्रमुख संतोष चामले व विलास शिंदे, सर्वच शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!