रंगकर्मीने केला पठाण, स्वामी, केदार पटेल यांचा सत्कार

0
रंगकर्मीने केला पठाण, स्वामी, केदार पटेल यांचा सत्कार

रंगकर्मीने केला पठाण, स्वामी, केदार पटेल यांचा सत्कार

उदगीर (एल पी उगिले) : रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने साहित्यिक रसूल पठाण, अंजली स्वामी, प्रा रामदास केदार, जहांगीर पटेल यांचा सत्कार करण्यात आला. रंगकर्मी प्रतिष्ठानच्या वतीने साहित्य क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त रसूल पठाण यांना पसायदान प्रतिष्ठान, गुहागर चा राज्यस्तरीय पसायदान पुरस्कार , अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे चा राज्यस्तरीय बाल साहित्य पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीमती अंजली स्वामी यांचा महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग आयोजित सिंगापूर अभ्यास दौरा 2025,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 मध्ये जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक,स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन महाराष्ट्र व महाराष्ट्र वुमेन टीचर्स फोरम तर्फे राज्यस्तरीय नारीशक्ती सन्मान पुरस्कार2025 तसेच महाराष्ट्र शिक्षक पॅनल राज्यस्तरीय सेवा सन्मान याबद्दल ,लेखक कवी, चित्रपट गीतकार प्रा.रामदास केदार यांचा लातूर येथील शाहू महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात चित्रपट पटकथा लेखन तंत्र व कौशल्य या पुस्तकाचा नुकतेच छत्रपती संभाजी नगर येथील एम.जी.एम. विद्यापीठाच्या एम. ए. मराठी अभ्यासक्रमात चिमणी चिमणी खोपा दे हा बालकथा संग्रह समावेश झाल्याबद्दल.तसेच जहांगीर पटेल यांना
राज्यस्तरीय आदर्श गुरुवर्य पुरस्कार मिळाल्याबद्दल रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. साहित्यिक रसूल पठाण, रामदास केदार, श्रीमती अंजली स्वामी व जहांगीर पटेल हे मागील सात आठ वर्षांपासून रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, पर्यावरण, साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत . त्या बद्दल शाॅल पुष्पगुच्छ देऊन फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी रंगकर्मीचे अध्यक्ष प्रा बिभीषण मद्देवाड , सचीव ज्योती मद्देवाड ,उपाध्यक्ष सिद्घार्थ सुर्यवंशी , लक्ष्मणराव बेंबडे, युवराज धोतरे ,हणमंत केंद्रे , संदीप निडवदे आदी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!