दि.ली. होळीकर प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. शरद कुमार तेलगाने यांचा सत्कार

0
दि.ली. होळीकर प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. शरद कुमार तेलगाने यांचा सत्कार

दि.ली. होळीकर प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. शरद कुमार तेलगाने यांचा सत्कार

उदगीर (एल पी उगिले) : तालुक्यातील एक यशस्वी डॉक्टर म्हणून नावारूपाला आलेले शरदकुमार तेलगाने हे श्यामलाल स्मारक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी असून शिक्षण महर्षी दि.ली. होळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिक्षण घेतले आहे. श्यामलाल स्मारक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या माध्यमातून दिगंबर होळीकर यांनी आपल्या प्रदीर्घकाळात शेकडो डॉक्टर आणि इंजिनियर्स घडवले. त्यासोबतच जीवनात यशस्वी झाल्यानंतर आपण इतरांची काळजी घेतली पाहिजे, ही सामाजिक जाण निर्माण केली. आणि “मनुर्भव”ची शिकवण दिली. अर्थात माणूस बना, समाजामध्ये एक दुसऱ्याचे सुखदुःख ओळखा, एक दुसऱ्याला मदतीचा हात द्या. या शिकवणीला यथार्थ करत डॉ. शरद कुमार तेलगाने यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपली वैद्यकीय सेवा सुरू ठेवली आहे. वैद्यकीय सेवे सोबतच सामाजिक जाणीवासाठी प्रबोधनात्मक किर्तन करून लोकजागृती करण्याचे कामही ते करतात. त्यामुळे दि.ली. होळीकर प्रतिष्ठानच्या वतीने दशकपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात या यशस्वी डॉक्टरचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. नागोराव कुंभार, राम जाधव, कोणाळे कोचिंग क्लासेस चे संस्थापक व्यंकटराव कोनाळे, हृदयरोग तज्ञ डॉ नारायण सुरवसे, उद्योगपती सूर्यकांत मुक्कावार, प्रा महारुद्र झेरकुंटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना डॉ. शरद कुमार तेलगाणे यांनी श्यामलाल स्मारक विद्यालयात होळीकर सरांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने विद्यार्थी कसे घडत गेले? शिस्त आणि अभ्यासाची जिद्द कशी निर्माण करावी? या सदर्भात दिलेल्या मार्गदर्शनाच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन केले. आणि या प्रतिष्ठानने आपल्याला सन्मानित केल्याबद्दल ऋण व्यक्त केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!