नरसिंगवाडी पाटी जवळ टेम्पोची थांबलेल्या कंटेनरला धडक,टेम्पोमधील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू
नरसिंगवाडी पाटी जवळ टेम्पोची थांबलेल्या कंटेनरला धडक,टेम्पोमधील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू
उदगीर (एल पी उगिले) : राज्य मार्गावरील नरसिंगवाडी पाटीजवळ समोरून अडवे येणाऱ्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव वेगात असलेला अयशर टेम्पोने पोकलेन घेऊन नादुरुस्त अवस्थेत थांबलेल्या कंटेनरला जोराची धडक दिली, टेम्पो मधील एकजण गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. निंगप्पा इरप्पा पाटील (वय ५० वर्षे, रा. सोलापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

सोलापूरवरून उदगीरकडे शेंगदाणा भरुन येणारा अयशर टेम्पो के ए २८ ए बी ३४१३ या क्रमांकाचा टेम्पो नरसिंगवाडी पाटी जवळ येताच समोरून दुचाकी अडवी आल्याने दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात टेम्पोची पोकलेन घेऊन नादुरुस्त अवस्थेत थांबलेल्या कंटेनरला जोराची धडक बसली. या अपघातात टेम्पोत बसलेले निंगप्पा पाटील यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उदगीर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा उपचारादरम्यान रात्री सातच्या सुमारास मृत्यू झाला. याप्रकरणी घटनास्थळी उदगीर ग्रामीण पोलीसांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला असून गुन्हा नोंदची प्रक्रिया सुरू आहे.
