भाजी मार्केट मधील सडलेल्या भाज्या, चिकन, मटण आणि मच्छी च्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा – महाराष्ट्र जन एकता संघटना

0
भाजी मार्केट मधील सडलेल्या भाज्या, चिकन, मटण आणि मच्छी च्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा - महाराष्ट्र जन एकता संघटना

भाजी मार्केट मधील सडलेल्या भाज्या, चिकन, मटण आणि मच्छी च्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा - महाराष्ट्र जन एकता संघटना

उदगीर (एल.पी. उगीले) : भाजी मार्केटमध्ये सडलेल्या भाजीपाला तसेच चिकन व मटन मार्केट मधून टाकाऊ पदार्थ, भाजी मार्केटच्याच कोनाड्यात टाकले जातात. तसेच मच्छी मार्केटची ही हालत तीच आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या परिसरात या कचऱ्यापासून दुर्गंधी निर्माण झाली आहे. इतकेच नाही तर पावसाळ्यात होणाऱ्या संभाव्य साथीच्या रोगांना ही परिस्थिती निमंत्रण देणारी ठरू शकते. नगरपालिकेच्या वतीने स्वच्छता विभागाच्या नावाखाली कोट्यावधी रुपयाचे टेंडर दिले जाते. मात्र प्रत्यक्षात स्वच्छतेचे तीन तेरा झाले आहेत. या कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगरपालिका प्रशासन आणि महसूल प्रशासनाने या संदर्भात तातडीने कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र जनएकता संघटनेच्या वतीने उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे आणि उदगीर नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा नगरपालिकेचे प्रशासक जाधव यांना संघटनेच्या वतीने रीतसर निवेदन दिले आहे.
या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन स्वच्छतेची काळजी घ्यावी, उदगीर येथील जुन्या भाजी मार्केटमध्ये फळ व भाजी विक्रेते दुकानदार तसेच मास, मटन विकणारी दुकाने आता वाढले आहेत. त्यामुळे परिसरात भाजीपाला कचऱ्याचे तसेच चिकन, मटन व मच्छीच्या टाकाऊ पदार्थांचे अवशेष याचा कचरा दररोज रहदारीच्या रस्त्यावर पडू लागला आहे.
उघड्यावर होणारी मटन, मच्छी विक्री थांबली पाहिजे. तसेच वेळेच्या वेळी कचरा उचलला गेला पाहिजे. परिसरातील दुकानदार, व्यापारी, रस्त्यावरून ये जा करणारे ग्राहक यांचीही होत असलेली गोची लक्षात घेऊन तसेच परिसरात घाण आणि दुर्गंधी निर्माण झाल्याने होणारी संभाव्य रोगराई पसरण्याची स्थिती विचारात घेऊन कारवाई करावी. वास्तविक पाहता सद्यस्थितीत नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी कचरा व्यवस्थापन न केल्यामुळे तसेच कचऱ्याची साफसफाई ही मुळातून पूर्णपणे स्वच्छ केली जात नसल्यामुळे शिल्लक राहिलेला कचरा जागेवरच सडून जात आहे. त्या ठिकाणी आळ्या तयार झालेल्या आहेत. त्यामुळे परिसरात फार मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. तसेच सदरच्या दुर्गंधीमुळे व सडलेल्या घाण वासामुळे पनचक्की गल्ली, मलगे गल्ली, आठाने गल्ली या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना फार मोठा आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच सदर ठिकाणी साचलेले टाकून दिलेले मटण चे अवशेष, मच्छी व चिकनचे अवशेष, अशा कचऱ्यामुळे 15 ते 20 कुत्रे एकत्र येऊन या रस्त्यावर जाणाऱ्या लहान मुलांना, महिलांना तसेच वयोवृद्ध नागरिकांना चावा घेत आहेत. त्यामुळे लहान मुलांना रस्त्यावरून शिकवणीसाठी जाणे सुद्धा त्रासाचे झाले आहे. इतर नागरिकांना देखील जीव मुठीत धरून ये जा करावी लागत आहे. सदर या सर्व गैरप्रकाराला नगरपालिका प्रशासन जबाबदार असून त्यांनी तात्काळ कारवाई करावी. अशी आग्रही मागणी केली जात आहे. स्वच्छता विभाग या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही सदरील निवेदनात करण्यात आला आहे. साफसफाई कर्मचाऱ्यावर आणि कंत्राट दारावर नगरपालिकेचे नियंत्रण राहिले नाही. साफसफाई चे कामकाज संबंधित कंत्राटदारा ऐवजी नवीन कंत्राटदाराकडे दिले जावे. अशीही मागणी केली जात आहे. या अर्जाचा गांभीर्याने विचार करून स्वच्छता नाही केल्यास तसेच भाजी मार्केट परिसरातील ठिकठिकाणी साचलेला कचराकुंडीतील आणि खाली पडलेला कचरा हलवावा, वेळोवेळी कचऱ्याची विल्हेवाट लावली जावी, या दृष्टीने नगरपालिका प्रशासनाने काम करावे. अन्यथा नाईलाजास्तव लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करणे भाग पडेल. असा इशाराही संघटनेच्या वतीने दिला आहे. तसेच गरज पडल्यास लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे. असेही निवेदन उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी संघटनेचे तालुका अध्यक्ष सिकंदर शेख, शहराध्यक्ष नोमान सय्यद, शहर कार्याध्यक्ष इरफान शेख, जिल्हा उपाध्यक्ष परवेज शेख, आबद बानिकर, साबिल शेख, नदीम लाला, शेख नवीजी नबु इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!