दहशत निर्माण करण्यासाठी लोखंडी सुरा, कत्ती बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल
दहशत निर्माण करण्यासाठी लोखंडी सुरा, कत्ती बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यातील मौजे डांगेवाडी येथील हनुमान मंदिराच्या समोर सार्वजनिक ठिकाणी दोन वेगवेगळ्या वाहनातून काही जण शासनाच्या वतीने जमावबंदी व हत्यार न बाळगण्याचे आदेश असताना त्या आदेशाचा भंग करून लोक जमा झाल्याचे आढळून आल्याने, वाढवणा पोलीस स्टेशन येथे आरोपी कुशल अंकुश अनलदास (वय 34 वर्ष रा. हंडरगुळी), हर्षल बालाजी चिंतलवार (वय 22 वर्ष राहणार हंडरगुळी), विश्वजीत संतोष भोसले (रा. हंडरगुळी), ऋषिकेश संतराम लिंबाळे (रा. हंडरगुळी), पवन मदे, कार्तिक बोळेगाव (रा. हंडरगुळी) दादा मिया मनोद्दीन कुरेशी (वय 34 वर्ष व्यवसाय मजुरी रा. वाढवणा बुद्रुक), आयनऊल्ला इस्माईल कुरेशी वय 40 वर्षे व्यवसाय मजुरी (रा. वाढवणा) अहमद मेहताब कुरेशी (वय 27 वर्ष व्यवसाय मजुरी रा. वाढवणा) यांच्याविरुद्ध गु.रं. न. 160 /25 कलम 4 /25 भारतीय हत्यार कायदा सह कलम 135 मपोका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी फिर्यादी शिवप्रताप किशनराव रंगवाळ पोलीस हवालदार वाढवणा यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदरील गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी लोखंडी सुरी, कत्त्या, व काठ्या तसेच एक पांढऱ्या रंगाची इंडिका विस्टा कार (क्रमांक एम एच 24 व्ही 43 78) जुनी वापरात असलेली अंदाजे किंमत तीन लाख आणि एक पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी इग्निस नेक्सा कार (क्रमांक एम एच 24 बी एल 22 18) जुनी वापरात असलेली अंदाजे किंमत चार लाख असा एकूण सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार तुकाराम बळदे हे करत आहेत.
