बालकिशनजी मुंदडा (गुरुजी) यांना “महेश भूषण” पुरस्कार

0
बालकिशनजी मुंदडा (गुरुजी) यांना "महेश भूषण" पुरस्कार

बालकिशनजी मुंदडा (गुरुजी) यांना "महेश भूषण" पुरस्कार

लातूर (एल पी उगिले) : जिल्हा माहेश्वरी सभा दरवर्षी महेश नवमीच्या निमित्ताने समाजहितासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना “महेश भूषण”* या प्रतिष्ठित पुरस्कारा ने सन्मानित केले जाते. यावर्षी हा सन्मान सनरिच एक्वा चे संचालक बालकिशनजी पांडुरंगजी मुंदडा (गुरुजी) यांना प्रदान करण्यात येणार आहे.गुरुजींनी अनेक वर्षांपासून उद्योग, शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात निस्वार्थपणे केलेल्या कार्यामुळे समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. समाजप्रेम, उदारता आणि निःस्वार्थ सेवा यामुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्याचमुळे लातूर जिल्हा माहेश्वरी सभा पुरस्कार समितीने त्यांची निवड “महेश भूषण” या सन्मानासाठी केली.
हा पुरस्कार हैदराबाद येथील ख्यातनाम उद्योगपती सौ. भगवती महेश बलदवा यांच्या शुभहस्ते, तसेच समाजातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत, गुरुवार, दिनांक ५ जून २०२५ रोजी दुपारी ४ वाजता, दयानंद सभागृह, लातूर येथे आयोजित भव्य समारंभात प्रदान केला जाणार आहे.
सदर निवडीचे पत्र देताना लातूर जिल्हा माहेश्वरी सभेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कासट, व जिल्हा सचिव फुलचंद काबरा, पुरस्कार समितीचे चेअरमन हुकुमचंद कलंत्री, कोषाध्यक्ष जगदीश भुतडा, उपाध्यक्ष ओमप्रकाश सारडा, महाराष्ट्र प्रदेश कार्य समिती सदस्य राजकुमार मंत्री, कार्यालयीन मंत्री चंदू लड्डा, संयुक्त मंत्री गोकुळ चांडक, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य रामेश्वर गिल्डा, मीडिया व प्रचार मंत्री श्याम भट्टड, महेश नवमी 2025 चे संयोजक ईश्वर बाहेती, संतोष तोष्णीवाल, गणेश हेड्डा, राहुल लोया हे उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!