नौकर नव्हे मालक व्हा,उद्योजक व्हा – कलीम भोयरेकर
नौकर नव्हे मालक व्हा,उद्योजक व्हा - कलीम भोयरेकर
लातुर (एल.पी.उगीले) : सुक्ष्म, लघु व मध्यम उद्यम मंत्रालय, भारत सरकार आणि महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादित यांच्या वतीने आयोजित रायझिंग अँड ऍक्सिलरेटिंग एम एस एम इ परफॉर्मन्स योजनेअंतर्गत एमआरएसडी इन्फोटेक सर्व्हिसेस प्रा. लि. या एजन्सी मार्फत एकदिवसीय कार्यशाळा साळे गल्ली, लातूर येथील युनिक स्किल अकॅडमी मध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी आपल्या व्याख्यानातून मार्गदर्शन करतांना कार्यशाळेत कलीम भोयरेकर म्हणाले की, नौकर नव्हे, मालक व्हा, उद्योजक कडे चला, स्वावलंबी व्हा. असे मत व्यक्त केले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, महिला उद्योजकांना शासनाच्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. जसे भारत सरकार मार्फत महिला उद्योजिकांसाठी विविध शासकीय कर्ज योजना उपलब्ध आहेत. या योजना महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्या साठी आर्थिक मदत पुरवतात. महिला उद्योजक योजनेचे प्रमुख उद्दिष्ट
महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देणे व त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे. मुख्य शासकीय योजना प्रधानमंत्री मुद्रा योजना सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देणे.यासाठी केंद्रशासन व राज्य शासन अनेक योजना राबवत आहे, त्या योजनांची माहिती घेऊन कर्ज उपलब्ध करून द्यावे, आणि महिलांनी स्वावलंबी व्हावे. असे आवाहन या शिबिराच्या प्रसंगी करण्यात आली.
