हकनकवाडी येथे लोकनेते स्व गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी साजरी
हकनकवाडी येथे लोकनेते स्व गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी साजरी
उदगीर (एल पी उगिले) : तालुक्यातील मुझे हकनकवाडी येथे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या 11 व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला.हकनकवाडी येथे ग्रामस्थांनी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेसमोर श्रीफळ ,पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी उपसरपंच नवनाथ फड, सदस्य केशव फड, बालाजी पवार, बालाजी कारलेवाड , सुग्रीव पवार, नागनाथ चोले , भानुदास फड, शिवाजी केंद्रे, रोहिदास पवार, संग्राम केंद्रे, उत्तम फड , विजय केंद्रे, ग्रामसेवक शरद जाधव, संदीप मुसळे, लक्षण मुंडे इत्यादी उपस्थित होते.
लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या एकूण जीवनकार्यावर सविस्तर मार्गदर्शन करताना, त्यांच्या जीवनातील प्रत्येक संघर्षमय प्रसंगाची सविस्तर माहिती ग्रामसेवकांनी दिली.
