कुणबी नोंदी पुन्हा शोधण्याची मराठा समाजाची मागणी ….. !

0
कुणबी नोंदी पुन्हा शोधण्याची मराठा समाजाची मागणी ….. !

कुणबी नोंदी पुन्हा शोधण्याची मराठा समाजाची मागणी ….. !

अहमदपुर (गोविंद काळे) : लातुर जिल्हयातील मराठा समाजाच्या कुणबी नोंदी पून्हा शोधून देण्याची मागणी गरजवंत मराठा समाजाच्या वतीने लातूर जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .
लातुर जिल्हयातील लातूर, देवणी, औसा, अहमदपूर,चाकूर, उदगीर, निलंगा, रेणापुर, शिरूर अनंतपाळ या तालुक्यातील कुणबी नोंदी तपासून प्रत्येक प्रत ग्रामपंचायतमध्ये कळविण्यात यावी जेणे करून मराठा समाजाच्या विद्याथ्र्याच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होऊ नये जेणेकरून जिल्हयातील तहसिल कार्यालय, भूमिअभिलेख, शाळा, नगर परिषद , निबंधक कार्यालय व इतर कार्यालयातील सर्व जुने रेकॉर्ड पुनश्च तपासणीसाठी उपलब्ध करुण द्यावेत मोडी अभ्यासक अॅड घनशाम रितापुरे व श्रीपाद कदम, हे समाज बांधवास सहकार्य करण्यास मदत करणार आहेत त्यामुळे जिल्ह्यातील ५ .६ .२०२५ पर्यत लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्याच्या निगराणीखाली कुणबी नोंदी शोधण्याचे काम करण्याचे आदेश प्रत्येक तालुक्यातील उपजिल्हाधिकारी, तहसिलदार यांना देण्यात यावेत आशि मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे या निवेदनावर लातुर जिल्हयातील सकल मराठा समाजाच्या सवाक्षऱ्या आहेत .

यावेळी जिल्हाधिकारी सौ . वर्षां घुगे ठाकूर यांनी तात्काळ संबंधित आधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत त्याची अमलबजावणी करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी सकल मराठा समाज बांधवाना सांगीतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!