अहमदपूर मध्ये भारत जिंदाबाद तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते
अहमदपूर मध्ये भारत जिंदाबाद तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले, गटाच्या वतीने काश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम येथील निर्गुण हत्याकांडाचा निषेध म्हणून व आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर घडवून आणून पाकिस्तानला सळो कि पळो करून त्यांच्या सोबत युद्ध करून त्यांना धडा शिकवण्याचे काम केलेले आहे. त्यामुळे आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले चे राष्ट्रीय नेते नामदार डॉ. रामदासजी आठवले यांच्या आदेशान्वये संपूर्ण भारतात आज भारत जिंदाबाद तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यानुसार आज अहमदपूर येथे भारत जिंदाबाद तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते ही रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून वाजत गाजत व देशभक्तीपर घोषणा देत ही रॅली निघून छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याजवळ याचा समारोप करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे, श्रीकांत बनसोडे, अरुण भाऊसाहेब वाघंबर, लक्ष्मीकांत बनसोडे, सुनील वाहुळे, बालाजी कांबळे, बळीराम मोरे, शेख चाँद,बाबू शेख, कुलदीप कांबळे, प्रदीप कांबळे, पांडुरंग धर्माधिकारी, गौतम सोनकांबळे, शरद सोनकांबळे, नागनाथ कांबळे, पद्माकर कांबळे, रमेश कांबळे,प्रकाश ससाने, बालाजी तुरेवाले, यांच्यासह सर्व समाजातील कार्यकर्ते, मिलिटरी मॅन, माजी सैनिक, असे असंख्य कार्यकर्ते या भारत जिंदाबाद तिरंगा रॅलीत उपस्थित होते.
