एक तास ऊर्जा बचत करून देऊ या पर्यावरण संरक्षणाचा संदेश
एक तास ऊर्जा बचत करून देऊ या पर्यावरण संरक्षणाचा संदेश
अहमदपूर (गोविंद काळे) : सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने 5 जून -‘जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने भारतातील प्रत्येक नागरिकांनी एक तास आपल्या घरातील दिवे बंद करून ऊर्जा बचतीचा संकल्प करूया व नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास टाळू या!ऊर्जा बचत म्हणजेच पर्यावरण रक्षण होय. एक तास घरातील सर्व विद्युत उपकरणे त्याचबरोबर हातात असलेला भ्रमणध्वनी हे सुद्धा एक तासासाठी पूर्णपणे बंद करून जागतिक पर्यावरण दिनात सहभागी व्हावेत असे आव्हान संस्थेचे सचिव राज्य पुरस्कार प्राप्त कलाशिक्षक महादेव खळुरे यांनी केले आहे.
संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करतो, जे जगभरात पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जागरूकता आणि कृतीला प्रोत्साहन देते.2025 हे वर्ष जागतिक पर्यावरण दिनाचे 52 वे वर्धापन दिन आहे. यावर्षी पर्यावरण संघटनेने प्लास्टिक प्रदूषण आणि कचऱ्याचे संकट हे थीम घेऊन जनजागृती करीत आहे.
प्लास्टिक प्रदूषणामुळे या तिहेरी ग्रहीय संकटाचे घातक परिणाम वाढतात: हवामान बदलाचे संकट , निसर्गाचे संकट , जमीन आणि जैवविविधतेचे नुकसान आणि प्रदूषण आणि कचऱ्याचे संकट . जागतिक स्तरावर, दरवर्षी अंदाजे 11 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा जलीय परिसंस्थांमध्ये गळती होते, तर कृषी उत्पादनांमध्ये प्लास्टिकच्या वापरामुळे सांडपाणी आणि लँडफिलमधून सूक्ष्म प्लास्टिक मातीत जमा होतात. प्लास्टिक प्रदूषणाचा वार्षिक सामाजिक आणि पर्यावरणीय खर्च 300 अब्ज अमेरिकन डॉलर्स ते 600 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका असतो. म्हणून प्लास्टिक वर बंदी येण्यासाठी सर्वांनी आपापल्या पद्धतीने प्रयत्न करावे. व आपला देश प्लास्टिक मुक्त भारत म्हणून ओळख निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावा.
भारतीय नागरिकांनी जेवढे शक्य होईल तेवढ्या प्रमाणात आजपासून प्लास्टिकचा वापर टाळावा. घरातील सर्व वस्तू प्लास्टिक मुक्त होण्यासाठी प्रयत्न करावा. बाहेर बाजारात जात असताना कापडी पिशवीचा वापर करावा. सृजन संस्थेने पर्यावरण संरक्षणासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत.
माझा देश माझा अभिमान चित्रकला स्पर्धा 15आँगस्ट 2021,
इको फ्रेंडली गणेश मूर्ती स्पर्धा,
भक्ती गीत गायन स्पर्धा (श्रावण मास 2021),जागतिक टपाल दिन पत्र लेखन स्पर्धा,जागतिक हात धुवा दिन स्पर्धा(15 आँक्टोबर2021),आपट्याच्या पानावरून राष्ट्रीय विषयावर जनजागृती 2021,पणत्या रंगरंगोटी स्पर्धा,आकाश कंदील बनविणे कार्यशाळा,पक्षी सप्ताह चित्रकला स्पर्धा 5-12नोव्हेंबर 2021,जागतिक तंबाखू विरोधी दिन चित्रकला स्पर्धा 31 मे 2021,विश्व इंधन दिन निमित्त सक्षम महोत्सवाचे आयोजन,इंधन संवर्धन जनजागृती कार्यक्रम 21सप्टेंबर 2021,पर्यावरण स्नेही दीपावली कार्यशाळा 28ऑक्टोबर 2021,ऊर्जा संवर्धन सप्ताह राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा 21डिसेंबर 2021,मतदार जनजागृती दिन चित्रकला स्पर्धा,31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिन चित्रकला स्पर्धा,उज्वल भारत उज्वल भविष्य चित्रकला स्पर्धा 2022,प्लास्टिक मुक्त गौरी सजावट स्पर्धा,सिंगल यूज प्लास्टिक बंदी राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा,आपट्याच्या पानावरुन जनजागृती. अशा अनेक उपक्रमातून पर्यावरण जनजागृतीचा संदेश दिला आहे. या संकल्पना प्रत्येक नागरिकांनी सहभागी होऊन राष्ट्रनिर्मितीसाठी आपला अमूल्य योगदान द्यावा.अशी संस्थेच्या वतीने विनंती करण्यात आली.
