भारतीय बौद्ध महा सभेच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
भारतीय बौद्ध महा सभेच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील सिध्दार्थ काॅलनीतील संस्कार बुध्द विहारात भारतरत्न ङाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने ङाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या व बौद्धांची मातृसंस्था म्हणून संबोधल्या जाणाऱ्या भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा अहमदपूर च्या नूतन कार्यकारिणीचा उपस्थित मान्यवर व समाज बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुकाध्यक्ष प्रसाद गायकवाड, उपाध्यक्ष बालाजी दुगाणे (संस्कार विभाग) महेंद्र धसवाङीकर ,सरचिटणीस माधवराव तिगोटे,कोषाध्यक्ष सोमप्रकाश सुर्यवंशी, सचिव वैजनाथ सुरवसे सल्लागार रा.सु.कांबळे, गौतम सोनकांबळे,विठ्ठलराव गायकवाड, बालाजी तुरेवाले,नामदेवराव साबणे,पांङूरंग धर्माधिकारी,भुजंगराव कांबळे,अॅङ.राजपाल गायकवाड, अॅङ अमित गायकवाड, यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर भालेराव कोषाध्यक्ष बाबासाहेब कांबळे लेंङेगांवकर सल्लागार सुजीत गायकवाड,एम.एन. क्षीरसागर, संजीवकुमार भालेराव, प्रा माधव तलवारे, अमोल कांबळे, ङाॅ.धम्मसागर वाघमारे,यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजित गायकवाड यांनी केले तर आभार जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर भालेराव यांनी मानले.
