शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्धापूरच्या व्यवस्थापन समितीवर राजेश्वर देशमुख, सुदर्शन रूमणे, अमित साबळे यांची निवड

0
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्धापूरच्या व्यवस्थापन समितीवर राजेश्वर देशमुख, सुदर्शन रूमणे, अमित साबळे यांची निवड

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली नियुक्ती

अर्धापूर :- उध्दव सरोदे

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अर्धापूरच्या संस्था व्यवस्थापन समितीवर अशासकीय सदस्य म्हणून राजेश्वर देशमुख, सुदर्शन रूमणे, अमित साबळे यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यतामंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. आयटीआयच्या व्यवस्थापन समितीवर अशासकीय सदस्य म्हणून अर्धापूर शहरातील स्व. स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मीकांतराव देशमुख यांचे चिरंजीव राजेश्वर देशमुख, जाभरूण येथील सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन रामराव रूमणे व अर्धापूर येथील अमित रवि साबळे या तिघांची निवड करण्यात आली आहे.

अर्धापूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य खालील प्रमाणे आहेत १) श्री बालाजीराव कंठेवाड (श्रवण इलेक्ट्रिकल वागद) अध्यक्ष, २) श्री अजय बंदेल (सम्राट इलेक्ट्रिकल नांदेड) सदस्य, ३) श्री राजेश गणवीर जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी नांदेड सदस्य, ४) प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन नांदेड – सदस्य ५) सहाय्यक संचालक कौशल्य विकास व रोजगार कार्यालय नांदेड सदस्य, ६) श्री डी एन मोरे गटनिदेशक आयटीआय अर्धापूर सदस्य, ७) विद्यार्थी प्रतिनिधी आयटीआय अर्धापूर – सदस्य 1 ८) श्री विश्वंभर कंदलवाड प्राचार्य सचिव, – सदस्य ९) राजेश्वर लक्ष्मीकांतराव देशमुख – सदस्य, १०) सुदर्शन रामराव रूमणे – सदस्य, ११) अमित रवि साबळे – सदस्य यांची निवड करण्यात आली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!