प्रबुद्ध भारत संस्था महाराष्ट्र शासनाच्या ” साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे ” पुरस्काराने सन्मानित.
उदगीर.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन मुंबई च्या वतीने दरवर्षी अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय जाती कल्याण,शारीरिक व मानसिक दृष्ट्या अपंग, कुष्ठरोगी यांच्यासाठी काम करणारे व समाज कल्याण क्षेत्रात मौलिक योगदान देणारे व्यक्ती आणि सेवाभावी संस्था यांच्या कार्याला प्रेरणा, ऊर्जा मिळावी म्हणून त्यांना दरवर्षी महाराष्ट्र शासनाद्वारे डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, कर्मवीर पदमश्री दादासाहेब भाऊराव कृष्णराव गायकवाड पुरस्कार दिले जातात. सन 2023.24 या वर्षीचे 90 व्यक्ति तर 40 सेवाभावी संस्थेला समाजभूषण पुरस्कार देऊन दिनांक 10 जून 2025 रोजी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सभागृहात महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. लातूर जिल्ह्यातून ” प्रबुद्ध भारत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था चांदेगाव ” तालुका उदगीर या संस्थेला 2023.24 या वर्षाचा सन्मानाचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्कार प्राप्त झाला. 2009 पासून ही संस्था दलीत , आदिवासी, उपेक्षित, भटके ,अल्पसंख्यांक समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढवे, अंधश्रधा निर्मूलन, महिला सबलीकरण , पर्यावरणाचे रक्षण, बालविवाह थांबण्यासाठी जनजागृती, व्यसनमुक्ती, पाणी अडवा पाणी जिरवा अशा महत्वाच्या विषयावर सतत काम करीत आलेली आहे. लातूर जिल्ह्यातून अशा एकमेव संस्थेची सरकारने दखल घेऊन निवड केली. संस्था अध्यक्ष नंदाताई प्रभुराव सूर्यवंशी व सचिव डॉ शिवाजीराव मरेप्पा देवनाळे यांचा महाराष्ट्र सरकारने रोख रक्कम ,सन्मान चिन्ह, देऊन सत्कार केला.
या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट, मंत्री संजय राठोड, मंत्री भरतशेट गोगावले, प्रधान सचिव हर्षदीप कांबळे,आमदार संतोष बांगर, यांच्या हाताने 130 पुरस्कार्थिना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अशा भूषणावह कार्यक्रमास महाराष्ट्रातील समाज कल्याण विभागाचे सर्व अधिकारी , सर्व पुरस्कर्ते व सेवाभावी संस्थेचे प्रमुख उपस्थित होते.
