जागतिक रक्तदाते दिनानिमित्त विविध ठिकाणी महा रक्तदान शिबिर,शेकडो डॉक्टर्स या शिबिरात रक्तदान करणार

0
जागतिक रक्तदाते दिनानिमित्त विविध ठिकाणी महा रक्तदान शिबिर,शेकडो डॉक्टर्स या शिबिरात रक्तदान करणार

लातूर ( प्रतिनिधी ):–
राष्ट्रीय शल्य चिकित्सक दिनानिमित्त लातूर सर्जिकल सोसायटी व इंडियन मेडिकल असोसिएशन आणि गुगळे मेमोरियल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला. शनिवारी शहरातील विविध भागात महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून ,जवळपास ६०० बॅग रक्त संकलन करण्याचा यावेळी संकल्प आहे. लातूरचे विद्यमान खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या हस्ते या महा रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय शल्य चिकित्सक दिनानिमित्त लातूर सर्जिकल सोसायटी व इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून ,15 तारखेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .यात विशेष करून रक्तपेढीतील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता महा रक्तदान शिबिरावर जास्त लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
गुगळे हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिर
शुक्रवारी सकाळी १० वाजता गुगळे मेमोरियल हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .या शिबिरात जवळपास ९० रक्तदात्यांनी रक्तदान केले. इंडियन मेडिकल असोसिएशनचे लातूर जिल्हाध्यक्ष डॉ. अभय कदम व डॉ. दिनकर काळे यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करून या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सर्जिकल सोसायटी ऑफ लातूरचे अध्यक्ष डॉ.योगदानंद दडगे, सचिव डॉ. निखिल काळे, उपाध्यक्ष डॉ. अभिजीत रायते ,महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सर्जेन्स ऑफ इंडियाचे एक्सिकेटीव्ह कौन्सिल मेंबर डॉ. दिपक गुगळे ,इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अभय कदम , वुमन्स विंगच्या अध्यक्षा डॉ. ज्योती सूळ ,डॉ. मेघना गुगळे, डॉ. हंसराज बाहेती, डॉ. दिनकर काळे ,डॉ. ज्ञानेश्वर चिंते ,डॉ. अजय पुनपाळे,डॉ. प्रभाकर कुलकर्णी, डॉ.रवी इरपतगिरे ,डॉ.ज्ञानेश्वर पांचाळ, डॉ.विद्यासागर बाहेती , डॉ. सुधीर फत्तेपूरकर, डॉ. गणेश असावा, डॉ. विक्रम सारडा, डॉ. नितीन सर्जे , डॉ. येलाले, डॉ. इरपे,डॉ एन.व्ही. कुलकर्णी आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विक्रमी रक्तदानवीर पारस चापसी ,अनिल डुंगरवाल ,नवजीवन रक्तपेढीचे दत्तात्रेय अपसिंगेकर ,डॉ‌ भालचंद्र रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी किशोर पवार यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. महादेव बावलगे ,मारुती आचेवर, सिद्राम पाथरकर ,विश्वजीत जबाडे ,महेश पाटील,सुनीता कुलकर्णी यांनी सर्वप्रथम रक्तदान केले. या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे डॉ. अजय पुनपाळे यांनी पण रक्तदान केले. शनिवारी महा रक्तदान शिबिर
राष्ट्रीय सर्जन सप्ताह अंतर्गत जागतिक रक्तदान दिनानिमित्त शनिवार दि.१४ जून रोजी सकाळी १०.३० वाजता भालचंद्र ब्लड बँक येथे महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .या शिबिराचे उद्घाटन लातूरचे विद्यमान खासदार डॉ.शिवाजी काळगे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. लातूर रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा लक्षात घेता या महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून ,या शिबिरामध्ये शेकडो डॉक्टर देखील रक्तदान करणाऱ आहेत हे विशेष …! व्हीडिजीएमसी, भालचंद्र ब्लड बँक ,संजीवनी ब्लड बँक, अर्पण ब्लड बँक, माऊली ब्लड बँक, लातूर ब्लड बँक ,गांधी चौक आदी ठिकाणी या महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे ,अशी माहिती यावेळी संयोजकांनी दिली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!