जिव्हाळा ग्रुपच्या वतीने आरती तोंडारे हिचा सत्कार

0
जिव्हाळा ग्रुपच्या वतीने आरती तोंडारे हिचा सत्कार

उदगीर (प्रतिनिधी)येथील जिव्हाळा ग्रुपच्या वतीने १२ वी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या आरती अशोक तोंडारे या विद्यार्थिनीचा सत्कार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास पुणे जनता बँकेचे शाखाधिकारी नानासाहेब हेळंबकर ,नेत्रतज्ञ डॉ.ज्योती सोमवंशी ,राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विश्वनाथ मुडपे ,व्ही. एस. कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक जिव्हाळा ग्रुपचे अध्यक्ष दशरथ शिंदे यांनी केले.प्रास्ताविकात त्यांनी उदगीरचे प्रेस फोटोग्राफर अशोक तोंडारे यांची आरती ही मुलगी गुणी विद्यार्थिनी असून तिने प्रतिकूल परिस्थितीत हे यश मिळवले असल्याचे सांगितले.या कार्यक्रमास देविदास नादरगे,विश्वनाथ बिरादार माळेवाडीकर, धनंजय गुडसुरकर, प्रा. दिलीप कांबळे, अंनिस चे प्राचार्य विजयकुमार पाटील, प्रा. बळीराम भुक्तरे , बाबुराव माशाळकर, डॉ. ज्योती सोमवंशी, नारायण रोडगे,मोहनराव खिंडीवाले , ऍड. राजकुमार नावंदर, महेश पाटोदकर, डॉ.दीपक सोमवंशी, जिव्हाळा ग्रुपचे उपाध्यक्ष अशोक बिरादार, अशोक दारनुळे, नवनाथ पाटील, शंकरराव केंद्रे यांच्यासह पालक, व शहरातील मान्यवर उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!