हिमायतनगर पोलिसांची तात्काळ कारवाई, वृद्धेच्या खूनाचा छडा, नातवाला अटक

0
हिमायतनगर पोलिसांची तात्काळ कारवाई, वृद्धेच्या खूनाचा छडा, नातवाला अटक

हिमायतनगर (प्रतिनिधी) येथे एका 75 वर्षीय वृद्ध महिलेच्या खूनप्रकरणी हिमायतनगर पोलीस आणि स्थानीक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने अवघ्या काही दिवसांत गुन्ह्याचा छडा लावत मयत वृद्ध महिलेच्या नातवाला अटक केली आहे.
यासंदर्भात पोलिसांकडून हाती आलेली माहिती अशी की,गयाबाई रामजी तवर उर्फ देवसरकर (वय 75, रा. टेंभुर्णी) यांचा 3 जून रोजी खून झाला होता. त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि घरातील रोख रक्कम मिळून सुमारे 2.74 लाखांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला गेला होता.
तपासात गयाबाई यांचा नातू मारोती उर्फ बाळू वानखेडे (वय 35, रा. दिघी) हा कर्जबाजारीपणामुळे आजीला लुटण्यासाठी तिच्या घरात घुसून तोंडात कपडा कोंबून आणि नाक दाबून तिचा खून केल्याचे निष्पन्न झाले.
आरोपीला अटक करून त्याच्याकडून ₹58,400 किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असून, उर्वरित मुद्देमाल मिळवण्यासाठी तपास सुरू आहे.ही कामगिरी पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांच्या मार्गदर्शना खाली पार पडली असून, त्यांनी संपूर्ण तपास पथकाचे अभिनंदन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!