नांदेड गुन्हे शाखेची तात्काळ कारवाई, जबरी चोरी प्रकरण उघडकीस; 1.65 लाखाचा ऐवज हस्तगत

0
नांदेड गुन्हे शाखेची तात्काळ कारवाई, जबरी चोरी प्रकरण उघडकीस; 1.65 लाखाचा ऐवज हस्तगत

नांदेड (प्रतिनिधी) नांदेड शहरात घडलेल्या जबरी चोरीच्या प्रकरणाचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत दोन आरोपींना अटक करून चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांच्या मार्गदर्शना खाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली. या सदर्भात हाती आलेली माहिती अशी की, फिर्यादी मोहम्मद मुदस्सर अन्सारी (रा. जी-6, कंधारी चाळ, सुंदरनगर साकीनाका, मुंबई. ह.मु. इस्लामपुरा, नांदेड) यांनी पोलीस स्टेशन इतवारा येथे 11 जून रोजी तक्रार दाखल केली होती की,10 जून रोजी रात्री 10.30 वाजता ते आपल्या कुटुंबासह हिलालनगर येथून इस्लामपुरा येथे ऑटो रिक्षातून जात असताना त्यांच्या पत्नी परवीन अन्सारी यांच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने सोन्याचा नेकलेस (अंदाजे 5 ग्रॅम) किंमत 48,000, रुपये,सोन्याचे झुमके (अंदाजे 10 ग्रॅम) किंमत 96,000, रोख रक्कम 21,000 रुपये असा एकूण मुद्देमाल: 1,65,000 रुपये चोरीस गेला आहे.
घटनेचा रीतसर अभ्यास करून पोलीस निरीक्षक रणजित भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली, इतवारा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे पोउपनि रमेश गायकवाड आणि त्यांच्या टीमने गुप्त माहितीच्या आधारे काही तासांतच संशयित झफर खान पिता अहमद खान (रा. इकबालनगर, देगलूर नाका, नांदेड) यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याच्याकडून चोरी गेलेला संपूर्ण ऐवज हस्तगत करण्यात आला.या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी तपास पथकाचे विशेष अभिनंदन केले आहे. ही घटना पोलिसांच्या तत्परतेचे व प्रभावी तपास कौशल्याचे उत्कृष्ट उदाहरण ठरली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!