छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयाच्या डेअरी विभागातील विद्यार्थ्यांची निवड

0
छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयाच्या डेअरी विभागातील विद्यार्थ्यांची निवड

उदगीर (प्रतिनिधी):
छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालयातील दुग्धशास्त्र विभागातर्फे दि. ३ मार्च २०२५ रोजी कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रतिष्ठित डोडला डेअरी, हैदराबाद, या नामवंत कंपनीद्वारे हे कॅम्पस इंटरव्यू घेण्यात आले होते. यावेळी नागेंद्र कुमार वरिष्ठ व्यवस्थापक आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. यामध्ये दुग्धशास्त्र विभागातील 5 विद्यार्थ्यांची यशस्वी निवड करण्यात आली.
या यशामुळे महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता, सन्मान व प्रतिष्ठा आणखी वृद्धिंगत झाली. किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर, सचिव पी.टी.शिंदे, व कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी,प्राचार्य डॉ. आर.एम. मांजरे, विभागप्रमुख डॉ. आर. बी. येडतकर व सर्व प्राध्यापकांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले, व त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!