अभाविपच्या मागणीला यश ! बी.एस.सी. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना अभाविप च्या प्रयत्नांनी विद्यावेतन लागू !

0
अभाविपच्या मागणीला यश ! बी.एस.सी. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना अभाविप च्या प्रयत्नांनी विद्यावेतन लागू !

अभाविपच्या मागणीला यश ! बी.एस.सी. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना अभाविप च्या प्रयत्नांनी विद्यावेतन लागू !

अहमदपूर (गोविंद काळे) : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून बी.एस.सी. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अंतरवासी (इंटर्नशिप) कालावधीदरम्यान विद्यावेतन मंजूर करण्यात आले आहे. हा निर्णय राज्यातील हजारो नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी अत्यंत दिलासादायक ठरणार आहे.

शासकीय बी.एस.सी. नर्सिंग अभ्यासक्रमांतर्गत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या इंटर्नशिप दरम्यान सकाळ, दुपार व रात्र अशा तीनही सत्रांमध्ये सेवा बजवावी लागते. आपत्कालीन परिस्थितीतही हे विद्यार्थी रुग्णसेवेचे कर्तव्य पार पाडतात परंतु या कालावधीत त्यांना कोणतेही मानधन किंवा विद्यावेतन मिळत नव्हते. या अन्यायकारक परिस्थितीच्या विरोधात अभाविपने आवाज उठवत प्रशासनाला अनेक वेळा निवेदन सादर करून बी.एस.सी. नर्सिंग विद्यार्थ्यांना दरमहा सात हजार रुपये विद्यावेतन देण्याची मागणी केली होती. राज्यातील गोरगरीब व शेतकरी कुटुंबांतील विद्यार्थी या कोर्समध्ये प्रवेश घेत असतात यामुळे विद्यार्थांना दिलासा मिळणार आहे.

शासनाने या निवेदनाची दखल घेत विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतला असून अभाविपच्या या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. अभाविप या निर्णयाचे स्वागत करत असून या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या अनेक समस्यांचे निराकरण होणार असून त्यांचे मनोबल उंचावन्यास मदत होईल तसेच त्यांच्या शिक्षणाच्या वाटचालीत सकारात्मक बदल घडून येईल.

अभाविप देवगिरी प्रदेश मंत्री कु.वैभवी ढिवरे म्हणाल्या की मागील अनेक दिवसांपासून बी.एस.सी. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन लागू व्हावे यासाठी अभाविप प्रयत्न करत होती. या प्रयत्नांना यश आले असून बी.एस.सी. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. अश्या अनेक समस्या विद्यार्थ्यांना येतात व त्या सोडवण्यासाठी अभाविप नेहमीच विद्यार्थ्यांसोबत असेल.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!