शांतीनिकेतन पतसंस्थेच्या कार्यकारिणीचा सत्कार
शांतीनिकेतन पतसंस्थेच्या कार्यकारिणीचा सत्कार
अहमदपूर ( गोविंद काळे )येथील शांतीनिकेतन वेतनधारी सेवकांची पतसंस्था मर्या अहमदपूरच्या नूतन संचालक मंडळाच्या सत्कार संस्थापक अध्यक्ष डी. बी. लोहारे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आला. नूतन संचालक मंडळात पतसंस्थेच्या अध्यक्षपदी रविकिरण साकोळकर व सचिव म्हणून कपिल बिरादार तर उपाध्यक्ष प्रा. गणेश मुस्तापुरे आणि कोषाध्यक्ष म्हणून विवेकानंद मठपती यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक कार्यालय लातूरच्या वतीने सहकार अधिकारी अहमदपूर श्रेणी 1 टापरे बी. बी. हे होते. यावेळी नुतन संचालक लक्ष्मण उदगीरे, श्रीधर लोहारे, नरसिंग हसनाबादे, संदीप पांचाळ, अरुण राठोड, गोविंद बळवंते, दिगंबर घनवे, केशव कोटंबे, शालिनी बोरसुरीकर, नागमणी हाळे, अनिता राजे यांचा सत्कार करण्यात आला. या निवडी बद्दल संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष डी. बी. लोहारे गुरुजी, माजी चेरमन पुष्पाताई लोहारे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक सांगविकर,इंजि. अनिल मुळे, डॉ. भालचंद्र पैके, डॉ. सुनिताताई चवळे, यशवंत विद्यालयाचे मुख्याध्यापक गजानन शिंदे, उपमुख्याध्यापक माधव वाघमारे, पर्यवेक्षक राम तत्तापुरे, शिवाजी सूर्यवंशी, सोमनाथ स्वामी, दिगंबर बयास, गौरव भुसारे, बालाजी सोनटक्के यांच्यासह सर्व पतसंस्थेच्या सभासदांनी नूतन संचालक मंडळाचे अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
