मिथुन चक्रवर्ती यांचा गेले 35 वर्षे झाले वाढदिवस साजरा करतोय अहमदपूर मधील सायकल मेकानिक नाझीम शेख
मिथुन चक्रवर्ती यांचा गेले 35 वर्षे झाले वाढदिवस साजरा करतोय अहमदपूर मधील सायकल मेकानिक नाझीम शेख
स्वतः मिथुन चक्रवर्ती यांनी याचे दखल घेऊन नाजिम शेख यांना बोलवले होते घरी..
अहमदपूर (गोविंद काळे) : दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते सिने अभिनेते न मिथुन चक्रवर्ती यांचा अहमदपूर येथे नाझिम शेख सायकल मेकॅनिक चाहता असून गेल्या 35 वर्षांपासून स्वखर्चाने मिथुनदांचा वाढदिवस साजरा करत आहेत. याही वर्षी 16 जून रोजी माझे सायकल मार्ट वर अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सायकलचे पंक्चर काढून प्रपंच भागवणाऱ्या या व्यक्तीच्या या प्रेमाने खुद्द मिथुनजींचेही मन जिंकले आहे. अहमदपूर शहरात वास्तव्यास असलेल्या या चाहत्याचे नाव आहे नाजीम शेख .
गरिबीमुळे नाजीम हे दहावीपर्यंतच कसेबसे शिक्षण घेऊ शकले. वयाच्या पंधराव्या वर्षांपासून त्यांनी सायकल दुरुस्तीचे काम सुरू केले. चित्रपट पाहण्याचा त्यांना छंद जडला. त्यावेळी मिथुन चक्रवर्तीच्या डॅशिंग भूमिकेची सर्वत्र चर्चा होत असे. अन्यायाविरुध्द आवाज उठवणारी व सामान्यांचे आवाज दडपणाऱ्यांना चारी मुंड्या चित करणारी मिथुन यांची भूमिका नाजीमला आवडायची व ही आवड इतकी जडली की मिथुनदांचे ते फॅन झाले. त्यांची चित्रे ते जमवू लागले. पूर्वी चित्रपटाची जाहिरात करण्यासाठी चित्रपटातील काही प्रसंगाचे, त्यातील नायक-नायिकांच्या छायाचित्रांचे भले मोठे कागदी पोस्टर भिंतीवर डकवले जात. मिथुनदांचे पोस्टर दिसले की नाजीम त्यास पुष्पहार घालत असत. त्यांनी आपल्या दुकानासही मिथुन यांचे भले मोठे पोस्टर लावले आहे.
याची दखल घेऊन मिथुन चक्रवर्ती यांनी नाझीम यांना पत्रव्यवाही केला आहे.
माझ्या जन्मदिनावर खर्च करावा एवढी मोठी व्यक्ती मी नाही. अवास्तव खर्च टाळून ही रक्कम एखाद्या गरजूस देण्यात यावी. माणसाने माणसांच्या गरजेला पडावे हा मानवधर्म आहे तो तू निश्चित जगवशील असा सल्ला मिथुनदाने नाजीमला पत्रातून दिला होता. तो नाजीमने कृतीतून स्वीकारला आहे.
यामुळे नाझीम यांनी इतर सर्वांच्या सहकार्याने मिथुन फॅन्स क्लब तर्फे गरजूंना मदत करणे, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण सारखे कार्यक्रम राबवले आहेत.
व गेले 35 वर्षे नाझीम त्यांच्या सायकल मार्ट वर मिथुनजींचा वाढदिवस साजरा करतात. चक्रवर्ती गरिबांना मदत करीत असत त्याच धर्तीवर नाजीम हे गरीब गरजूंना मदत करू लागले. दरम्यान चंदन तस्कर विरप्पनने मिथुनला अपहरण करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे नाजीम धास्तावले होते. विरप्पनला अटक करण्यात यावी, अशी मागणी करीत यासाठी आत्मदहनाचा इशारा दिला होता. ही बातमी वाचून चक्रवर्ती यांनी नाजीमला पत्र पाठवले. त्या पत्रात ‘जाको राखे साईयां मार सकेना कोई, नाजीम तू चिंता नको मला कोणापासूनही धोका नाही’, असा धीर मिथुनदांनी त्याला दिला होता. ते पत्र आजही नाजीमच्या संग्रहात आहे.
स्वतः मिथुन चक्रवर्ती यांनी नाजिम शेख यांना फोन करून त्यांच्या घरी बोलावले,
मिथुनदांनी नाजीमला ‘हॉटेल मोनार्क’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते. नाजीम तेथे पोहचले परंतु सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवले. मिथुनदांनी सांगताच नाजीमला आदराने
हॉटेलात प्रवेश देण्यात आला. मिथुनदा व त्यांच्या परिवारासमवेत नाजीमने भोजन केले. दादांनी नाजीमची गळाभेट घेतली व तुला काय हवय? असा प्रश्न केला. त्यावर नाजीम ने, ‘दादा बस एक बार अपने जन्मदिन के अवसरपर मेरे शहर मे आये’ अशी अपेक्षा व्यक्त केली. त्या क्षणापासून आजपर्यंत नाजीम मिथुनदांची वाट पाहत आहे. दादा त्याच्या सायकल दुकानावर जरूर येतील, असा त्यांना विश्वास आहे..
असा हा मिथुन वेडा नाजिम शेख अहमदपुरकरांचे ही खूप मोठे आकर्षण आहे. प्रतिवर्षी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मिथुन चक्रवर्ती चा वाढदिवस साजरा केला जातो. या कार्यक्रमास शेकडो चाहते उपस्थित राहतात.
वाढदिवस कार्यक्रमाला तत्कालीन आमदार व महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सुद्धा अनेक वेळा हजरी लावली आहे.
महाराष्ट्राचे माजी मंत्री बाळासाहेब जाधव या कार्यक्रमाला प्रत्येक वर्षी अर्जुन उपस्थित राहतात
.
नाजिम शेख यांनी मिथुन फॅन क्लब काढून
त्या मार्फत विविध सामाजिक उपक्रम सुद्धा घेतले जातात.
यामध्ये नव वर्षाच्या पूर्व संध्येला व्यसनमुक्ती अभियान साजरे करत दूध वाटप केले जाते.
वर्षभर विविध ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेतले जातात.
रक्तदान शिबिर मिथुन फॅन्स क्लब तर्फे घेतले जाते.
नाझिम शेखा गेले 40 वर्षे झाले या सायकल रिपेरिंग च्या व्यवसायात आहे. अहमदपूर शहरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांच्या सायकलींना निशुल्क हवा भरणे.
अतिशय कमीदारामध्ये त्यांची सायकल दुरुस्ती करणे. हे नाझिम शेख चे वैशिष्ट्य आहे.
नाझिम शेख चा आवडता मिथुन चक्रवर्ती आहे. मात्र गेले 35 वर्ष मिथुन चा वाढदिवस साजरा करणारा नाझीम शेख अहमदपुरकरांचा आवडता आहे. नाझीम याने
स्वतःच्या सायकल रिपेरिंग च्या दुकानाच्या माध्यमातून अनेक गरीब विद्यार्थ्यांची निशुल्क सायकल दुरुस्ती करून दिली.
ते विद्यार्थी आज मोठे अधिकारी झाले आहेत अहमदपूरहून जाताना निश्चित नाझीम यांच्या सायकल मार्ट वर थांबून त्यांना भेटून जातात. अशा या मिथुन वेड्या नाझीम शेख चे अहमदपूर करांना मात्र खूप कौतुक वाटते.
