परभणी आकाशवाणीवर यशवंत विद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांने साधला संवाद

0
परभणी आकाशवाणीवर यशवंत विद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांने साधला संवाद

परभणी आकाशवाणीवर यशवंत विद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांने साधला संवाद

अहमदपूर (गोविंद काळे) : ऑल इंडिया रेडिओच्या परभणी आकाशवाणी केंद्रावरून यशवंत विद्यालयातील कु.दिपाली अंभोरे,कु.स्नेहल साखरे, कु.आराध्या पाटील,दक्ष पाटील या चार विद्यार्थ्यांने सुसंवाद साधला आहे. सदरील कार्यक्रमाचे प्रसारण दिनांक 15 जून सकाळी 11:35 वाजता बालमंडळ या कार्यक्रमात प्रसारण होणार आहे.
यशवंत विद्यालय अहमदपूर येथे मराठी भाषेचे संवर्धन तसेच प्रचार व प्रसार करण्यासाठी विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर भाषण कौशल्य, विविध वकृत्व स्पर्धेमध्ये सहभाग देऊन विद्यार्थ्यांचे मराठी भाषेचे ज्ञान संपन्न केले जाते.विद्यार्थ्यांना ऑल इंडिया रेडिओ चे आकाशवाणी केंद्र या व्यासपीठावर संधी उपलब्ध करून दिले जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आकाशवाणी हे कौतुकास्पद बाब आहे.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जाही मिळाला आहे.मराठी भाषेचा प्रचार प्रसार होऊन भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी शालेय स्तरावर पण विविध उपक्रम घेणे अपेक्षित आहे. मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी,
भाषेच्या संवर्धनासाठी यशवंत विद्यालयात विविध उपक्रम राबविले जातात.
विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्त कलागुणांचा शोध घेऊन त्यांना आकाशवाणीचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी कलाशिक्षक महादेव खळुरे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. यशवंत विद्यालय म्हणजे गुणवत्तेचे खाण आहे. विविध कला व क्रीडा क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळते. आज यशवंत विद्यालयातील कु.दिपाली अंभोरे यांनी
” भारतीय संस्कृती” या विषयावर आकाशवाणीवरून संवाद साधला आहे. तिचे मराठी भाषेवर असलेले प्रभुत्व व संभाषण कौशल्य ऐकण्यासारखे आहे. कु.स्नेहल साखरे यांनी “छत्रपती शिवाजी महाराज” या विषयावर महाराजाच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकण्याचा छान प्रयत्न केला आहे.
कु. आराध्या पाटील हीने स्त्री शिक्षण या विषयावर भावनिक सुसंवाद साधला आहे.
दक्ष पाटील यांने” शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर” या विषयावर विचार व्यक्त केली आहे.
आकाशवाणी वर सुसंवाद साधल्याबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे टागोर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक सांगवीकर,संस्थेचे सचिव डी बी लोहारे गुरुजी,उपाध्यक्ष डाँ भालचंद्र पैके,सहसचिव डाँ सुनिता चवळे,प्राचार्य गजानन शिंदे, उपमुख्याध्यापक माधव वाघमारे,पर्यवेक्षक रामलिंग तत्तापुरे, शिवाजी सुर्यवंशी, मराठी विषयाचे शिक्षक संतोष पारशेट्टे, सौ सविता झोळगीकर,सौ विजया स्वामी,श्रीधर लोहारे,राजकुमार पाटील,संतोष कदम,बबन मेंडके यांच्यासह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन व कौतुक केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!