रुद्र महिला मंडळाच्या वतीने वृक्षारोपण

0
रुद्र महिला मंडळाच्या वतीने वृक्षारोपण

रुद्र महिला मंडळाच्या वतीने वृक्षारोपण

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील रुद्र महिला मंडळाच्या वतीने संत ज्ञानेश्वर विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गणेश दादा हाके पाटील, रुद्र महिला मंडळाच्या अध्यक्षा विजयाताई चवंडा, सचिव शांताबाई गिराम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने रुद्र महिला मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी वृक्षारोपण करून संगोपन करण्यात येते.
या प्रसंगी दाक्षायणी महिला मंडळाच्या अध्यक्षा उमा शेटकार उपाध्यक्षा धनश्री शेटकार, योगशिक्षिका कलावती भातांब्रे, हारुबाई निटुरे, सुलोचना कल्याणी, रमा शेटकार, सुजाता शिवपुजे, सविता शेटकार, संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे, रोकडोबा कुंडगीर, नंदकुमार मध्येवाड, सतीश साबणे, मीना होनराव, बब्रुवान कलाले, पद्माकर नळगिरे, विवेकानंद सुरनर, शीला तेलंगे यांच्यासह महिला सदस्या उपस्थित होत्या. सर्वांनी एकत्र येऊन वृक्षारोपणाच्या उपक्रमात सहभाग घेतला आणि पर्यावरण रक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
महाराष्ट्र शासनाने राज्यात दहा कोटी वृक्ष लागवडीचा तर अहमदपूर नगर परिषदेने 25000 वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी संकल्प केला आहे. या संकल्पाला पाठबळ देत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे व माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. दत्तात्रय मठपती यांनी वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत रुद्र महिला मंडळ व दाक्षायणी महिला मंडळाने हा उपक्रम यशस्वीपणे राबवला.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल व रोप देऊन सत्कार करण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आणि समाजात पर्यावरण जागृती होण्यास मदत होईल, असा विश्वास भाजपा प्रवक्ते गणेश दादा हाके यांनी व्यक्त केला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!